Surprisingly ...! Thieves steal water from the glacier; Price of Rs 8.5 lakh
आश्चर्यच...! चोरट्यांनी हिमनगाचेच पाणी चोरले; किंमत 8.5 लाख रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 01:55 PM2019-02-18T13:55:43+5:302019-02-18T14:03:05+5:30Join usJoin usNext कॅनडाच्या न्यूफाऊंडलँडमध्ये चोरांनी एका व्होडका कंपनीमधून तब्बल 30 लाख लीटर पाण्याची चोरी केली. पोलिस या महाभागांना शोधत असून हे पाणी काही साधारण नव्हते. तर ते हिमनगापासून मिळविलेले पाणी होते. या पाण्याच्या शुद्धतेमुळे महागडी व्होडका आणि कॉस्मेटिक उत्पादने बनविण्यासाठी याचा वापर केला जातो. या चोरी झालेल्या पाण्याची किंमत 8.5 लाख रुपये होती, असे या कंपनीने सांगितले. पोलिसांनुसार चोरांनी ही चोरी एकाच दिवशी नाही तर वेगवेगळ्या दिवशी केली असावी. या शिवाय या चोरांना या पाण्याच्या उपयुक्ततेचीही माहिती होती. कारण अन्य लोकांना हिमनगाचे पाणी आणि सर्वसाधारण पाण्यात फरक करता येत नाही. आईसबर्ग कंपनीचे सीईओ डेविड मायर्स यांनी या चोरीच्या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणात कंपनीतीलच कोणाचातरी हात असल्याची शंका व्यक्त केली आहे. कंपनीमध्ये या पाण्याचे टँक आहेत. हे टँक पासवर्ड प्रोटेक्टेड आहेत. तसेच हे पाणी कुठे ठेवले आहे याबाबत गुप्तता बाळगली जाते. कंपनीने पाण्याचा विमा उतरवला होता. त्याचे पैसे मिळतीलच वर्षभरात समुद्रात तरंगणाऱ्या एकाच हिमनगाला तोडून पाणी काढण्यासाठी आणले जाते. कारण हिवाळ्यामध्ये हिमनग कठीण बनतात. यामुळे त्यांना तोडणे कठीण बनते. हिमनग तोडण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. यानंतर त्याला कापण्यासाठी क्रेन, मोठमोठाले कटर, हायड्रॉलिक मशिन आदी वापरावे लागते. यानंतर कापलेला हिमनगाचा तुकडा स्पीड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर आणला जातो. त्यानंतर क्रेनद्वारे उचलून कंटेनरमध्ये ठेवला जातो. वाफेद्वारे वितळवण्यात येतो.