मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी विजय रुपानी यांनी केले देवदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 17:13 IST2017-12-26T17:10:12+5:302017-12-26T17:13:29+5:30

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी विजय रुपाणी यांनी आज पूजा अर्चा केली.

विजय रुपाणी यांनी गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

विजय रुपाणी यांनी सपत्नीक गांधीनगरमधील पंचदेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय रुपाणी यांनी काँग्रेसचे श्रीमंत उमेदवार इंद्रनील राजगुरु यांच्यावर राजकोट पश्चिममधून मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला.