यासिन मलिक खातोय तुरुंगाची हवा, त्याच्या बायकोची पाकिस्तानात एवढी चर्चा का? By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:24 AM 2023-08-18T10:24:20+5:30 2023-08-18T11:06:05+5:30
मुशाल हुसैन मलिकने 2009 मध्ये फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी यासिन मलिकसोबत लग्न केले होते. काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक भारताच्या तुरुंगात बंद आहे. परंतू, त्याची पत्नी मुशाल हुसैन मलिक पाकिस्तानात चर्चेत आली आहे.
मुशाल हुसैन मलिक हिची पाकिस्तानमधील मानवाधिकारांवर पंतप्रधानांची विशेष सहाय्यक (SAPM) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुशालचा जन्म 1986 मध्ये कराची, पाकिस्तानमध्ये झाला होता. मुशालने इस्लामाबादमधील बीकनहाऊस या प्रसिद्ध शाळेतून शिक्षण घेतले आहे.
मुशाल हुसैन मलिकने 2009 मध्ये फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी यासिन मलिकसोबत लग्न केले होते.
मुशाल मलिक तिच्या चित्रकलेच्या आवडीसाठी प्रसिद्ध आहे.
मुशालचे वडील हुसेन मलिक हे अर्थतज्ज्ञ होते. ते कायदे-ए-आझम मोहम्मद अली जिना विद्यापीठ, इस्लामाबाद येथे प्राध्यापक राहिले आहेत.
मुशाल हुसैन मलिक काश्मीर वाद आणि तिचा पती यासीन मलिक यांच्याबद्दल बोलत असते.