तो किस्सा! अटलबिहारी वाजपेयींनी एपीजे अब्दुल कलामांच्या मागे इंटेलिजन्स ब्युरो लावलेली; कोणालाच खबर नव्हती By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:54 PM 2022-11-24T21:54:16+5:30 2022-11-24T21:57:48+5:30
पोखरणची अणुचाचणी, भारत-पाकिस्तानातील कारगील युद्ध अशा काळात तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे नेतृत्व साऱ्या जगाने पाहिले होते. वाजपेयी कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. पोखरणची अणुचाचणी, भारत-पाकिस्तानातील कारगील युद्ध अशा काळात तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे नेतृत्व साऱ्या जगाने पाहिले होते. वाजपेयी कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. एका मताने सरकार पडले, वाजपेयी त्याच ताकदीने पुन्हा निवडून आले होते. याच वाजपेयींनी भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यामागे आयबी देशाची सर्वोच्च गुप्तचर यंत्रणा लावली होती.
13 मे 1998 रोजी देशाने पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. एपीजे अब्दुल कलाम यांनी या पोखरणची चाचणी यशस्वी केली होती. त्यावेळी वाजपेयींशी त्यांचा परिचय वाढला होता. कलाम तसे सर्वांनाच तेव्हा मिसाईल मॅन म्हणून परिचित होते. परंतू, तेव्हा एक मोठी घटना घडली. देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी कलाम यांच्या नावाची वाजपेयींनी घोषणा केली होती.
अकराव्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक अत्यंत रंजक होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले राष्ट्रपती निवडून देणार होते. पण, कलामांचे व्यक्तीमत्व इतके मोठे होते की त्यांच्या नावाला विरोध करणे देशाला परवडणारे नव्हते. राजकीय डावपेचांमध्ये अटलजींचा हात कोणी धरू शकत नव्हता. 2002 मध्ये त्यांनी कलामांचे नाव घोषित करून विरोधकांच्या गोटात खळबळ उडवून दिली होती.
कलाम यांच्या नावाची घोषणा केली खरी, पण कलाम कुठे होते. वायजेपी स्वत: याची फोन करून माहिती देणार होते. कलाम त्यांच्या घरी नाहीत, ऑफिसमध्येही नाहीत. कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. वाजपेयींनी कलामांना शोधण्याची जबाबदारी आयबीवर सोपविली. देशाचा एवढा महनीय व्यक्ती, मिसाईल मॅन असा अचानक गायब होतो. अवघी आयबी कलाम यांचा शोध घेण्यासाठी आकाशपाताळ एक करत होती. या कानाची त्या कानाला खबर नव्हती.
काही दिवसांनी दिल्लीत फोन वाजला. कलाम दक्षिण भारतातील एका छोट्याशा गावात असल्याचे समजले. जेव्हा आयबीचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा कलाम १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. कलामांच्या नावाची घोषणा होताच, देश देखील अचंभित झाला होता. वाजपेयींनी कलामांना फोन केला आणि तुमच्या नावाची आम्ही शिफारस केल्याचे सांगितले. विरोधकांबरोबरच कलामांसाठी देखील ही एक गुगलीच होती.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. एका एरोस्पेस शास्त्रज्ञाने जुलै 2002 मध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. 25 जुलै 2007 पर्यंत ते राष्ट्रपती पदी विराजमान राहिले होते.