पंडित नेहरुंची सोन्याची काठी म्हणून देशाचा राजदंड ठेवला होता, पंतप्रधान मोदींना जेव्हा समजले... By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:50 PM 2023-05-25T12:50:16+5:30 2023-05-25T12:57:46+5:30
स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला राजदंड नव्या संसदेत ठेवला जाणार. मोठा इतिहास आहेच, पण त्याची कथाही रंजक आहे... नव्या संसद भवनाचे रविवारी उद्घाटन होत आहे. हा सोहळा संस्मरणीय ठरावा, यासाठी संसदेत ऐतिहासिक राजदंड विराजमान करणार आहेत. राजदंडाला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. तो तमिळनाडूतील विद्वानांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजदंड सुपूर्द केला जाईल. हा राजदंड संसदेत लोकसभा सभापतींच्या पोडियमवर ठेवण्यात येणार असल्याचे काल गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
चोल साम्राज्याचा वारसा निष्पक्ष आणि न्यायपूर्ण शासनाचे प्रतीक म्हणून राजदंड ओळखला जातो. प्राचीन काळात प्रामुख्याने चोल साम्राज्यात राजा-महाराजांच्या सत्ता हस्तांतरणावेळी त्याचा वापर केला जात असे.
चोल साम्राज्यात राजा त्याच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करताना त्यास राजदंड देत असे.
भारतीय स्वातंत्र्यावेळीही वापर १५ ऑगस्ट १९४७ रोजी लॉर्ड माऊंट बॅटन यांनी सत्ता हस्तांतरण विशिष्ट प्रतीकात्मक पद्धतीने करायचे आहे का, अशी विचारणा पंडित जवाहरलाल नेहरूंना केली. नेहरूंनी त्याबाबत सहकाऱ्यांशी चर्चा केली. ज्येष्ठ नेते सी. राजगोपालचारी यांनी तमिळनाडूतील राजदंड पद्धतीबाबत माहिती दिली. त्यानंतर ते तामिळनाडूतून मागवण्यात आले. स्वातंत्र्याच्या मध्यरात्री माऊंटबॅटन यांच्या हस्ते राजदंड स्वीकारत पंडित नेहरू यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारली.
तामिळनाडूमध्ये राजदंडला निष्पक्ष आणि न्यायपूर्ण शासन व्यवस्थेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. संस्कृत शब्द ‘संकू’वरून ‘राजदंड’ उद्धृत झाला आहे. ‘संकू’ म्हणजे ‘शंख’ होय. हिंदू संस्कृतीत शंख ही पवित्र वस्तू म्हणून तसेच सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणूनही वापरल्या जाते. म्हणूनच राजदंड हा भारतीय राजव्यवस्थेत शक्ती आणि अधिकाराचे प्रतीक म्हणून दर्जा दिला आहे.
आतापर्यंत कुठे होता? प्रयागराजच्या एका संग्रहालयात पंडित नेहरू यांची सोन्याची काठी म्हणूनही राजदंड जतन करण्यात आला होता. मात्र तो राजदंड असल्याचा दावा नुकताच चेन्नईतील गोल्डन कोटिंग कंपनीने केला होता.
मध्ये सत्ता हस्तांतरणावेळी माऊंटबॅटन यांच्या सूचनेनुसार राजदंड आम्ही तयार करून दिल्याचे कंपनीने सांगितले. नेहरूंना तो मिळाल्यानंतर तो प्रयागराज येथील नेहरूंच्या आनंद भवन या निवासस्थानी होता.
मध्ये तो संग्रहालयात ठेवण्यात आला. दीड वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींना १९४७ मधील राजदंडबाबतच्या ऐतिहासिक घटनेबाबत सांगण्यात आले.
मोदींच्या सूचनेनुसार राजदंडाचा शोध घेण्यात आला. त्याचा शोध लागल्यानंतर या राजदंडाबाबत चेन्नईच्या सुवर्णकारांकडून त्याची खात्री करण्यात आली.