महिला वर्गाचा कल नोकरी सोडण्याकडे? काय आहे यामागचं कारण अन् सर्व्हेक्षणात काय हाती लागलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 08:36 AM2022-04-15T08:36:16+5:302022-04-15T08:39:44+5:30

भारतीय नोकरदार महिला वर्गाचा कल नोकरी सोडण्याकडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. यामागचं कारण काय? जाणून घेऊयात...

भारतीय नोकरदार महिला वर्गाचा कल नोकरी सोडण्याकडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामागे अनेक कारणे असली तरी कामाच्या वेळेत असलेला लवचीकतेचा अभाव, हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

८३ टक्के महिलांना कोरोना महासाथीमध्ये आपण अधिक लवचीकपणे काम करू शकतो असे आढळले.

टाळेबंदीचा काळ संपल्यानंतर पुन्हा ऑफिसात जाऊन काम करताना कामाच्या वेळा लवचीक असाव्यात, असे या नोकरदार महिलांना प्रकर्षाने जाणवू लागले.

७२ टक्के नोकरदार महिला स्वातंत्र्य कामाच्या ठिकाणी मिळत नसल्याने अशा नोकऱ्यांच्या प्रस्तावाचा स्वीकारच करण्यास तयार नाहीत.

७० टक्के महिलांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे किंवा त्या मन:स्थितीत आहेत, असे या सर्वेक्षणात आढळून आले.

कामातील लवचीकपणामुळे कार्यालय त्यांचे काम व वैयक्तिक जीवन यांच्यात समतोल अधिक चांगल्या पद्धतीने साधला जात असल्याचे नोकरदार महिलांचे निरीक्षण आहे.

चांगली कामगिरी नोंदविणाऱ्या संस्थांना आपल्याकडील प्रतिभावान कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवायचे असेल तर त्यांना लवचीक धोरणांचा स्वीकार करावा लागेल. अन्यथा देशात महिला नोकरदारांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :महिलाWomen