"... तेव्हा PM मोदींनी संसदेत वन नेशन, वन इलेक्शनवर केलं होतं भाषण"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 05:41 PM2023-09-01T17:41:41+5:302023-09-01T18:10:14+5:30

सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन विधेयक केंद्र सरकार संसदेत आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन विधेयक केंद्र सरकार संसदेत आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

त्यातच, केंद्र सरकारने वन नेशन, वन इलेक्शन यासाठी शुक्रवारी एक समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही समिती एक देश, एक निवडणूक यावर काम करेल.

केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं हे विशेष अधिवेशन होत आहे. गणेशोत्सव काळातच हे अधिवेशन होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्ते केली असून विरोधी पक्षाने मोदी सरकारवर टीका केलीय.

विरोधकांनी जरी टीका केली असली तरी, विद्यमान राज्य सरकारने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या विधेयकाचं स्वागत आहे.

अद्याप संसदेचं विशेष अधिवेशन नेमकं कशासाठी बोलावलंय, हे निश्चित नाही. मात्र, राजकीय वर्तुळाच एक देश, एक निवडणूक विधेयकासाठीच हे अधिवेशन असल्याची चर्चा आहे. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी केलेलं एक भाषण समोर आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी संसदेत भाषण करताना वन नेशन, वन इलेक्शनवर भूमिका मांडली होती. यावेळी, त्यांनी याचं समर्थन करत भाषण केलं होतं.

मला अनेकजण विरोधी पक्षातील वरिष्ठ, अनुभवी नेते एकटे भेटल्यावर याबाबत बोलतात. वन नेशन, वन इलेक्शन झालं तर बरंय. म्हणजे, ५ वर्षातून एकदाच निवडणुका घ्या, २ ते ३ महिने तो निवडणुकांचा उत्सव होईल. त्यानंतर, सगळे कामात व्यस्त होतील.

सार्वजनिकपणे भूमिका घेताना अडचणी येत असतील, पण हे काळाची गरज नाही का, असा सवाल मोदींनी विचारला होता. तसेच, यापूर्वी १८ आणि २१ अशी मतदारांची रचना असल्याने दोनवेळा निवडणुका होत होत्या.

आता, निवडणुकीसाठी सर्वांनाच वयाच्या १८ व्या वर्षी मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. आता, जेवढ्या निवडणुका आहेत, तेवढ्या मतदान याद्या असतात, त्यासाठी किती मोठा खर्च होतो, मॅन पॉवर लागते, असे मोदींनी संसदेतील भाषणात म्हटले होते.

मोदींचा हा जुना व्हिडिओ आता नव्याने व्हायरल झाला असून विशेष अधिवेशनात वन नेशन, वन इलेक्शन विधेयक येणार असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. ज्यास मोदींचे संपूर्ण समर्थन दिसून येते.