Thengwa Dekhaub Tab ... A poem written by Amitabh on Corona Awakening
आवै दौ करौना-फरौना... कोरोनाची जनजागृती करणाऱ्या महानायकाचा बंगला सील By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 03:46 PM2020-07-12T15:46:06+5:302020-07-12T15:59:55+5:30Join usJoin usNext बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन बच्चन यांना करोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि बी-टाऊनमध्ये एकच खळबळ उडाली. पाठोपाठ अमिताभ लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना सुरु झाली. राजकीय नेत्यांपासून तर बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसह अनेकांनी अमिताभ लवकर बरे व्हावेत, अशी कामना करत सोशल मीडियावर टिष्ट्वट केलेत. ट्विटरवर क्षणात #AmitabhBachchan आणि #AbhishekBachchan हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आलेत. अभिनेते अनुपम खेर, तापसी पन्नू, सोनम कपूर अशा अनेकांनी अमिताभ व अभिषेक लवकरच बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. बॉलिवूडप्रमाणेच मामूटी, महेश बाबू या दाक्षिणात्य कलाकारांनीही बिग बी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. अमिताभ यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर अभिषेक बच्चन यांचाही कोरोनाचा अहवाला पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतंर, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांची प्रथम टेस्ट निगेटीव्ह आली होती. ऐश्वर्या राय आणि आराध्या यांची दुसरी टेस्ट घेतल्यानंतर, तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, जया बच्चन वगळता संपूर्ण बच्चन फॅमिलीला कोरोनाची लागण झाल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. बच्चन कुटुंबीयांसाठी देशभरातून चाहते प्रार्थना करत आहेत, ट्विटर आणि फेसबुकवरही बच्चन कुटुबीयांसाठी गेट वेल सूनचे मेसेज लिहिण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी कोरोना जनजागृतीचा संदेश दिला होता. काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी भोजपुरीमध्ये कोरोना जनजागृतीपर एक कविताही लिहिली होती. 'चलौ हमऊं कर देत हैं जैसन बोलत हैं सब, आवै दौ करौना-फरौना ठेंगवा देखाउब तब', असे आपल्या अंदाजात म्हणत अमिताभ यांनी कोरोनाला पळवून लाऊ, असा संदेश दिला होता. मात्र, अमिताभ यांच्यासह आज त्यांच्या कुटुंबातील इतर 3 सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने सर्वच खळबळ उडाली असून अमिताभ यांनी केलेल्या जनजागृतीसंदर्भातही चर्चा होत आहे. दरम्यान, यापूर्वीही लॉकडाऊन काळात अमिताभ यांनी काही सेलिब्रिटींना एकत्र करत, कोरोना काळात घरीच बसण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आज बच्चन कुटुंबीयांचा बंगला बीएमसीने सील केला आहे, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून हे घर घोषित करण्यात आलंय.टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चनकोरोना वायरस बातम्यामुंबईAmitabh BachchanAbhishek Bacchancorona virusMumbai