ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 18 - सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात अनेक लॅपटॉप बाजारात आले आहेत. यामध्ये अनेक नामवंत कंपन्याचे लॅपटॉप आपल्याला कमी किंमतीपासून ते अधिकाअधिक किंमतीपर्यंत बाजारात पाहायला मिळतील.मॉक्रोसॉफ्ट, एसर, एचपी, डेल, लिनोव्हो अशाच काही कंपन्यांचे अगदी 20 हजारांपासून ते 50 हजार रुपयांच्या रेंजमधील लॅपटॉप आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जाणून घ्या, खालील 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे हॉट लॅपटॉप... 1) मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस लॅपबुक (Rs 8,990)तुमचं बजेट जर अगदी दहा हजारापर्यंत असेल, तर तुमच्यासाठी मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस लॅपबुक सर्वोत्तम आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 11.6 इंचाचा असून विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तसेच, इंटेल अॅटॉम प्रोसेसर, 2 जीबी रॅम, 32 जीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच, या लॅपटॉपची बॅटरी लाईफ दहा तासांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याचबरोबर स्पीकर्स, वेबकॅम, वायफाय आणि ब्लूट्युथची सोय करण्यात आली आहे. 2) आयबॉल कॅम्पबुक Exemplaire (Rs 12,000)आयबॉल कॅम्पबुक Exemplaire हा लॅपटॉपचं बजेट वीस हजार रुपयांपर्यंत आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 14 इंचाचा आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच, वजन 1.46 किलो असून ऑपरेटिंग सिस्टिम विन्डोज 10 आहे. तर बॅटरी 10,000mAh असून 8.5 तासांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे. 3) एसर ES1-521 (Rs 19,999)एसर र कंपनीचा Acer ES1-521 हा लॅपटॉप वीस हजारच्या रेंजमध्ये आहे. याची किंमत 19,999 रुपये इतकी असून 15.6 इंचाचा डिस्प्ले आहे. क्वॉड-कोअर एएमडी A4-6210 प्रोसेसर, 4 जीबी रॅम, एएमडी Radeon R3 graphics आणि 500 जीबी डार्ड ड्राईव्ह आहे. तसेच, वजन 2.4 किलो आहे. एचडी वेबकॅम, डीव्हीडी रायटर, वायफाय आणि ब्लूट्युथची सोय आहे. 4) एचपी 15-BG002AU (Rs 24,490)एचपी कंपनीचा HP 15-BG002AU हा लॅपटॉप 20 ते 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आहे. यांची किंमत 24,490 इतकी आहे. यामध्ये क्वॉड-कोअर एएमडी A8 processor, 4 जीबी रॅम आणि 4 सेल बॅटरी आहे. हा 15.6 इंचाचा असून resolution 1366 x 768 इतके आहे. वजन 2.2 किलो आणि विन्डोज 10 प्रोसेसर आहे. तसेच, optical drive, 1 x USB 3.0 port, 2 X USB 2.0, Ethernet, HDMI, multi-card reader आणि ड्युअल स्पीकर्स आहेत. 5) एसर Aspire ES1-572 (Rs 28,490)एसर कंपनीचा Aspire ES1-572 हा सुद्धा 20 ते 30 हजाराच्या बजेटमधील हा लॅपटॉप आहे. याची किंमत 28, 490 इतकी आहे. यामध्ये 4 जीबी डीडीआर 4 रॅम, 500 जीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी आहे. विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम असून बॅटरी बॅकअप 6.5 तासांचा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच, या लॅपटॉपचे वजन 2.4 किलो असून यामध्ये USB 3.0 port, 2 x USB 2.0 port, HDMI, SD card reader, Ethernet, optical drive, stereo speakers सुद्धा देण्यात आले आहेत. 6) Dell Inspiron 3565 (Rs 29,990)अमेरिकेतील नामांकित डेल कंपनीचा Inspiron 3565 हा लॅपटॉप 29,990 रुपयांपर्यंत येऊ शकतो. यामध्ये 6 जीबी डीडीआर 4 रॅम आहे. एएमडी APU A9 ड्युअल कोअर प्रोसेसर असून 1 टीबी इतकी इंटरनल स्टोरेज मेमरी आहे. पाच तासांचा बॅकअप असणारी 4 सेल बॅटरी आहे. तसेच, ड्युअल USB 3.0 port, USB 2.0 port, HDMI, Ethernet, SD card reader, optical drive and dual speakers असून याचा 15.6 इंचाचा एलईडी डिस्प्ले आहे. 7) डेल Vostro 3468 (Rs 34,990)जर तुमचे बजेट 30 हजारांपेक्षा जास्त असेल, तर डेल कंपनीच्या इतर लॅपटॉपपेक्षा स्वस्तात असलेला Dell Vostro 3468 हा लॅपटॉप मस्त आहे. या लॅपटॉपची किंमत 34,990 रुपये इतकी आहे. इंटेल कोअर i3 प्रोसेसर असून 14 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तसेच, याचे वजन 2 किलो आहे. तर, 4 जीबी रॅम, 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी बॅकअप आहे. याचबरोबर ड्युअल USB 3.0 ports, USB 2.0 port, Ethernet, HDMI, VGA, optical drive, SD card reader आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. 8) लिनोव्हो Ideapad 310 (Rs 35,990)लिनोव्हो कंपनीचा Lenovo Ideapad 310 हा लॅपटॉप 35 ते 40 हजार रुपयांच्या रेंजमधील आहे. या लॅपटॉपचा प्रोसेसर 7th जनरेशन एएमडी A10 असून 8 जीबी रॅम आणि 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आहे. तसेच, 2 जीबी मेमरी असलेले एएमडी ग्राफिक्स यामध्ये आहे. याचं वजन 2.2 किलो आहे. तर 15.6 इंचाचा एचडी डिस्प्ले, 1 x USB 3.0 port, 2 X USB 2.0 port, VGA, HDMI, SD card reader आणि optical drive यांच्यासोबतच स्पिकर्स, एचडी वेबकॅम आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. 9) एचपी 15-AY503TU (Rs 38,990)एचपी कंपनीचा HP 15-AY503TU हा लॅपटॉप 40 हजार रुपयांच्या रेंजमधील आहे. 6th जनरेशन इंटेल कोअर i5 प्रोसेसर असलेल्या या लॅपटॉपमध्ये 4 जीबी रॅम, 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी आहे. तसेच, हा लॅपटॉप लाईटवेट असून 15.6 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तर, 2 x USB 2.0 port, 1 x USB 3.0 port, HDMI, Ethernet, optical drive आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे.