These are the features of the 'Karanj'
समुद्र राखणाऱ्या नौदलाच्या 'करंज'ची ही आहेत वैशिष्ट्ये! By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 02:50 PM2018-01-31T14:50:31+5:302018-01-31T14:53:49+5:30Join usJoin usNext 'करंज'ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. मेक इन इंडियाअंतर्गत तयार केलेली ही पाणबुडी आपल्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे शत्रूला नेमकं शोधून मारा करू शकते. 'करंज' पाणबुडीची ६७.५ मीटर लांबीचीतर १२.३ मीटर उंचीची आहे. तिच वजन १५६५ टन आहे. 'करंज' टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते. युद्धाच्या वेळी 'करंज' अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते. या पाणबुडीचा वापर प्रत्येत प्रकारच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामातही केला जाऊ शकतो. 'करंज'चं सर्वात मोठं वैशिष्ट्यं असं की ती कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत नाही. या पाणबुडीतून जमीनीवरही मारा करता येतो.