These are the major and historic cities of India situated on the banks of the river
ही आहेत नदीकिनारी वसलेला भारतातील मोठी आणि ऐतिहासिक शहरे By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 04:18 PM2019-08-31T16:18:50+5:302019-08-31T16:30:28+5:30Join usJoin usNext जगातील विविध देशांमध्ये त्या त्या देशातील प्रमुख शहरे नदीकिनारी वसलेली दिसून येतात. भारतातही नदीकिनारी वसलेली अशी काही शहरे आहेत ज्यांचे महत्त्व फार मोठे आहे. आज जाणून घेऊया नदीकिनारी वसलेल्या भारतातील प्रमुख शहरांविषयी. हरिद्वार हरिद्वार हे उत्तराखंडमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले धार्मिक शहर आहे. येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते.अलाहाबाद (प्रयागराज) प्रयागराज हे उत्तर प्रदेशमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर वसलेले शहर आहे. येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते.वाराणसी वाराणसी हे उत्तर प्रदेशमधील एक धार्मिक शहर आहे. येथे काशी विश्वनाथाचे मंदिर आहे. पाटणा बिहारची राजधानी असलेले पाटणा शहर गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. आग्रा आग्रा शहर यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. येथील ताजमहाल जगप्रसिद्ध आहे. दिल्ली देशाची राजधानी दिल्लीदेखील यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेली आहे. टॅग्स :भारतIndia