These are the massive dams in India, the beauty here is indescribable
ही आहेत भारतातील महाकाय धरणे, येथील भव्यता पाहून दिपतात डोळे By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 08:38 PM2019-07-18T20:38:38+5:302019-07-18T20:51:50+5:30Join usJoin usNext नद्यांवर बांधलेल्या मोठमोठाल्या धरणांनी आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. आज जाणून घेऊया देशातील अशाच काही महाकाय आणि भव्यदिव्य धरणांविषयी. टिहरी धरण, उत्तराखंड उत्तराखंडमध्ये असलेले टिहरी धरण हे जगातील आठवे आणि भारतील सर्वात मोठे धरण आहे. हे धरण भागिरथी नदीवर २६१ मीटर उंचीवर बांधण्यात आले आहे. भाक्रा धरण, हिमाचल प्रदेश भाक्रा हे हिमाचल प्रदेशमधील मुख्य धरण आहे. हे भारतातील दुसरे सर्वात मोठे धरण आहे. याची उंची २२५ मीटर आणि लांबी ५२० मीटर आहे. हे धरण सतलज नदीवर बांधण्यात आले आहे. त्याच्या जलाशयाला गोविंद सागर या नावाने ओळखले जाते. सरदार सरोवर, गुजरात सरदार सरोवर हे धरण गुजरातमधील सर्वात मोठे धऱण आहे. या धरणाच्या बांधकामावरून अनेक वादही झाले होते. याची उंची १६३ मीटर आहे. तसेच या धरणाच्या परिसरात आला सरदार पटेल यांचा भव्य पुतळाही उभारण्यात आला आहे. हिराकुंड धरण, ओदिशा ओडिशामधील हिराकुंड धरण हे स्वातंत्रोत्तर काळातील सिंचन क्षेत्रामधील सर्वात महत्त्वपूर्ण असे धरण आहे. हे आतापर्यंतचे सर्वात लांब धरण आहे. याची लांबी सुमारे २६ किमी आहे. हे धऱण संभलपूर येथे महानदीवर बांधण्यात आले असून, त्याची उंची ६० मीटर आहे.नागार्जुन सागर, तेलंगाणा तेलंगाणामधील नागार्जुन सागर हे धरण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बांधण्यात आले आहे. कृष्णा नदीवर बांधलेले हे धरण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. टॅग्स :धरण पर्यटनधरणभारतdam tourismDamIndia