These are the Modi Navdurgas, know about them
या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 03:22 PM2017-09-22T15:22:41+5:302017-09-22T15:32:32+5:30Join usJoin usNext या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकराच्या मंत्रीमंडळाचा फेरबदल झाला. यामध्ये कॅबिनेट मंत्री दर्जात महिलांना 13 टक्के वाटा मिळाला आहे. इतकेच नव्हे तर कांही महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार महिलांवर सोपविला गेला आहे. मोदी मंत्रीमंडळातील या नवदुर्गांची जाणून घेऊ थोडक्यात ओळख या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती निर्मला सीतारमण या मोदी मंत्रीमंडळात वित्त खात्याच्या राज्यमंत्री होत्या त्यांना प्रमोट करून संरक्षण मंत्री बनविले गेले आहे. 54 वर्षीय निर्मला तमीळनाडूच्या आहेत आणि दक्षिणेतील त्या एकमेव महिला मंत्री आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एमफीलची पदवी घेतली आहे. या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती सुषमा स्वराज या 63 वर्षांच्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार त्यांनी सुरवातीपासूनच अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे. यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. दिल्ली सुप्रीम कोर्टात त्यांनी वकीली केली आहे. या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती मनेका गांधी यांच्याकडे महिला व बालविकास खात्याचा कार्यभार आहे. प्राणी हक्क चळवळीशी त्या पूर्वीपासून संबंधित आहेत. पर्यावरण जागृतीचे कामही त्या करतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी पदवी घेलती आहे. इंदिरा गांधीचे पुत्र संजय गांधी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती सुरवातीला शिक्षण मंत्रालयाचा कारभार सांभाळणार्या स्मृती इराणी यांच्याकडे आता कपडा व माहिती प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार दिला गेला आहे. त्या महिला मंत्र्यांमधील सर्वात तरूण म्हणजे 38 वर्षांच्या आहेत. मॉडेल, अभिनेत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजलेली आहे. फेमिना मिस इंडियाच्या 1998 सालच्या स्पर्धेत त्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती उमा भारती यांच्याकडे पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार आहे. त्यांनी पूर्वी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. फायर ब्रांड मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्या 6 व्या इयत्तेपर्यंत शिकलेल्या आहेत. या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती हरसिमरनकौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योगाचा कार्यभार आहे. त्यांनी मॅट्रिक नंतर टेक्स्टाईल डिप्लोमा केला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिह बादल यांच्या त्या स्नुषा आहेत.या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती अनुप्रिया पटेल या आरेाग्य व परिवार कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री आहेत. या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती कृष्णा राज या कृषी मंत्रालयाच्या राज्यमंत्री आहेत.या आहेत मोदी मंत्रिमंडळातील नवदुर्गा, जाणून घ्या त्यांच्याबद्दलची माहिती साध्वी निरंजन ज्योती ह्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री आहेत. टॅग्स :सरकारनरेंद्र मोदीसुषमा स्वराजGovernmentNarendra ModiSushma Swaraj