These are the places in India is look like Switzerland
ही आहेत स्वित्झर्लंडला तोडीस तोड असलेली भारतातील ठिकाणे By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 01:46 PM2018-08-08T13:46:36+5:302018-08-08T14:10:38+5:30Join usJoin usNext स्वित्झर्लंड म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं ते तेथील नयनरम्य निसर्गसौंदर्य. पण भारतातही स्वित्झर्लंडच्या तोडीस तोड अशी ठिकाणे आहेत. तेथील सृष्टीसौंदर्य हे स्वित्झर्लंडपेक्षा तसूभरही कमी नाही. अशाच काही ठिकाणांचा घेतलेला हा आढावा. गंगटोक - सिक्कीमची राजधानी असलेले गंगटोक हे छोटेसे शहर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. तसेच येथील प्राचीन मंदिरे, मठ आणि महाल प्रेक्षणीय आहेत. युक्सोम - युक्सोम ही सिक्कीमची पहिली राजधानी होती. कांचनजंगा शिखरावर चढाई करताना येथेच बेस कॅम्प लावला जातो. त्सोमगो लेक - त्सोमगो लेक हा परिसरही स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य स्थळांएवढाच सुंदर आहे. नथु ला - नथू ला खिंड भारतातील सिक्कीम या राज्याला चीनमधील स्वातशी प्रांताशी जोडते. निसर्गरम्य असलेल्या या परिसराला भेट देण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. पेलिंग - पेलिंग हे ठिकाण पर्यटकांमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय ठरत आहे. जगातील तिसरे सर्वात उंच शिखर असलेले कांचनजंगा येथून अगदी जवळून पाहता येते. रुमटेक मोनाट्री - येथे 16वे ग्यालवा कर्मापा यांचे घर आहे. येथील मठांमधील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. टॅग्स :पर्यटनबातम्याtourismnews