Google वर भारतीयांनी सर्वात जास्त शोधली 'ही' पर्यटन स्थळं; वाचा यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:42 IST2024-12-13T16:33:37+5:302024-12-13T16:42:54+5:30
भारतीय प्रवाशांसाठी २०२४ हे वर्ष खूप खास होते. भारतीय पर्यटकांमध्ये नवनवीन ठिकाणे फिरण्याची क्रेझ यंदाही खूप पाहायला मिळाली. याच कारणामुळे भारतीयांनी गुगलवर सर्च केलेली १० ठिकाणे ट्रेंड होत आहेत. यातील काही ठिकाणे आंतरराष्ट्रीय होती, तर काही भारतामधली प्रेक्षणीय पर्यटन स्थळे होती.

अझरबैजान तिथल्या समृद्ध संस्कृती, आधुनिक वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. काकेशस पर्वत आणि कॅस्पियन समुद्राजवळ वसलेला हा देश बजेट फ्रेंडली आंतरराष्ट्रीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटकांना इथले बर्फाच्छादित पर्वत, प्राचीन मशिदी आणि मनोरे यांसारखी आकर्षणे आवडतात.
इंडोनेशियातील बाली हे सुंदर बेट भारतीयांचे आवडते ठिकाण आहे. बाली समुद्रकिनारे आणि नयनरम्य मंदिरांसाठी ओळखले जाते. उलुवातु मंदिर, मंकी फॉरेस्ट आणि सेमिन्यक बीच ही भारतीय प्रवाशांसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाणे होती.
हिमाचल प्रदेशचे मनाली हिल स्टेशन दरवर्षी भारतीय पर्यटकांची मने जिंकते. २०२४ मध्येही मनाली सर्च लिस्टमध्ये टॉपवर होते. येथे बर्फाळ पर्वत, रोहतांग पास, सोलांग व्हॅली आणि बियास नदीच्या काठावर घालवलेले क्षण पर्यटकांसाठी संस्मरणीय ठरले.
नैसर्गिक सौंदर्य आणि आकर्षक संस्कृती असलेले कझाकिस्तान भारतीय पर्यटकांमध्ये एक नवीन ट्रेंड म्हणून उदयास आले आहे. तलाव, हिमनदी आणि अल्माटीसारख्या शहरांनी भारतीय प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.
राजस्थानची राजधानी जयपूरलाही २०२४ मध्ये प्रर्यटकांनी खूप सर्च केले होते.'पिंक सिटी' म्हणून ओळखले जाणारे जयपूर हे समृद्ध वारसा, किल्ले आणि राजवाडे यासाठी ओळखले जाते. आमेर किल्ला, सिटी पॅलेस आणि हवा महल ही भारतीयांची आवडती ठिकाणे होती.
जॉर्जिया हा एक छोटा पण अतिशय सुंदर युरोपीय देश आहे.जॉर्जियाने यावर्षी भारतीय प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथील डोंगराळ भाग, द्राक्षबागा आणि पारंपरिक खाद्यपदार्थ पर्यटकांना खूप आवडले.
मलेशिया हे शहर गगनचुंबी इमारती, सुंदर बेटे आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी भारतीयांचे आवडते स्थान बनले आहे. पेट्रोनास ट्विन टॉवर्स, लँगकावी बेटे आणि जॉर्जटाउन सारखी ठिकाणे २०२४ मध्ये सर्वाधिक चर्चेत होती.
धार्मिक महत्त्वामुळे, अयोध्या या वर्षीही भारतीय प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय राहिली. राम मंदिराच्या उभारणीनंतर हे ठिकाण धार्मिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनले आहे. इथली संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म पर्यटकांना आकर्षित करत होते.
‘पृथ्वीवरील नंदनवन’ म्हटले जाणाऱे काश्मीर २०२४ मध्येही भारतीयांच्या हृदयावर राज्य करत आहे. दल सरोवर, गुलमर्ग आणि पहलगाम सारखी ठिकाणे हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये लोकप्रिय आहेत.
गोव्याचा दक्षिण भाग हा शांततापूर्ण किनारे आणि लक्झरी रिसॉर्ट्ससाठी ओळखला जातो. दक्षिण गोव्याचा पालोलेम बीच, काबो डी रामा आणि अगोडा फोर्ट ही २०२४ मध्ये सर्वाधिक शोधलेली ठिकाणे होती. (सर्व फोटो : Reuters)