These commandos in Thailand will be stunned by training
थायलंडमधील ही कमांडो ट्रेनिंग पाहून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 03:54 PM2018-02-20T15:54:40+5:302018-02-20T15:57:22+5:30Join usJoin usNext कोबरा गोल्ड ही आशियातील सर्वात मोठी लष्करी कवायत आहे. या लष्करी कवायतींमध्ये अमेरिका, थायलंड आणि अन्य देशातील कमांडोज सहभागी होतात. थायलंडच्या किनारी भागात 10 दिवस चालणाऱ्या या संयुक्त सराव कवायतींमध्ये कमांडोजना 'जंगल सर्व्हाव्हयल प्रोग्राम' अंतर्गत अत्यंत बिकट परिस्थितीत जिवंत राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यावेळी थायलंडच्या लष्करी अधिकाऱ्यांनी कमांडोजना प्रशिक्षण दिले. विंचू आणि सापाच्या शरीरातील विष काढून त्यांना कसे खाता येईल, याविषयी कमांडोजना माहिती देण्यात आली. जंगलात अडकून पडल्यानंतर कोणत्या वनस्पतींचा अन्न म्हणून वापर करता येईल किंवा पाणी कसे शोधायचे,याचे धडेही कमांडोजना देण्यात आले. जंगलात असताना काय खावे किंवा काय खाऊ नये, याचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. या लष्करी कवायतींमध्ये अमेरिकेचे 6800 सैनिक सहभागी झाले होते.टॅग्स :सोशल व्हायरलSocial Viral