these famous persons left their indian citizenship
सुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:02 PM2019-01-23T16:02:27+5:302019-01-23T16:33:00+5:30Join usJoin usNext भारतात जन्मलेल्या अनेक व्यक्तींनी परदेशात स्थायिक होऊन जागतिक स्तरावर नावलौकिक कमावला आहे. मात्र यापैकी अनेकांनी माघारी फिरून भारतात येण्यापेक्षा परदेशातील नागरिकत्व पत्करून तिथेच राहणे पसंत केले. अशाच काही प्रसिद्ध व्यक्तींचा घेतलेला हा आढावा. सुंदर पिचाई - गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांचा जन्म भारतातील तामिळनाडू राज्यामधील मदुराई येथे झाला होता. आयआयटी खडगपूर येथून इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले. तिथे स्थायिक झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. सत्या नाडेला - मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा जन्म भारतातील हैदराबाद येथे झाला होते. ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यानंतर तिथेच स्थिरावले. नाडेला यांनी सुद्धा भारताचे नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. विक्रम पंडित - जागतिक कीर्तीचे बँकर विक्रम पंडित यांचा जन्म नागपूरमध्ये झाला होता. मुंबईमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वयाच्या 16 व्या वर्षी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. इंदिरा नुई - पेप्सीच्या माजी सीईओ असलेल्या इंदिरा नुई यांचा जन्म चेन्नई येथे झाला होता. उच्च शिक्षणासाठी येल विद्यापीठात प्रवेश मिळवल्यानंतर त्यांनी परदेशातच करिअर केले. तसेच अनेक वर्षांपूर्वी त्यांनी भारताचे नागरिकत्वही सोडले. सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. व्यंकटरमन रामाकृष्णन - तामिळनाडूतील चिदंबरम येथे जन्मलेल्या व्यंकटरमन रामाकृष्णन यांना 2009 साली केमिस्ट्रीतील नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. रामाकृष्णन यांनी बडोदा येथून विज्ञान विषयाची पदवी घेतल्यानंतर अमेरिकेकडे प्रयाण केले. त्यानंतर अनेक वर्षांपासून ते ब्रिटनमध्ये राहत आहेत. एम. एफ. हुसेन - प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेने हे त्यांच्या चित्रांमुळे वादग्रस्त ठरले होते. अखेरीस त्यांना देश सोडावा लागला होता. मृत्यूपूर्वी काही वर्षे त्यांनी कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते. हरगोविंद खुराणा - प्रसिद्ध शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांनी संशोधनासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने 60 च्या दशकात देश सोडून ब्रिटनमध्ये राहण्यास सुरुवात केली. पुढे त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला होता. टॅग्स :सुंदर पिचईSundar Pichai