These features are special in Vande Bharat Express
वंदे भारत एक्स्प्रेसचा वेगळाच असेल थाट! ही वैशिष्ट्ये आहेत खास By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 03:50 PM2019-02-12T15:50:33+5:302019-02-12T15:59:21+5:30Join usJoin usNext 'ट्रेन 18' म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या एक्सप्रेसमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे दोन प्रकारचे डबे आहेत. वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. जाणून घेऊयात या एक्स्प्रेसची काही खास वैशिष्ट्ये. ट्रेन 18 अर्थात वंदे भारत एक्स्प्रेस ही 'मेक इन इंडिया' योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे. चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी १८० किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते. कितीही वेगानं धावली तरी प्रवाशानं भरून ठेवलेली पाण्याची बाटलीही कलंडणार नाही, इतकी या रेल्वेची स्थिरता असेल, असा दावा करण्यात आलाय. १६ डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे. या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल. या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल. रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालयं असतील. रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि 'अॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स' असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल. ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील. जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल. प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील. सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील. पहिल्या 'ट्रेन १८'मध्ये १६ चेअरकार डबे असतील. त्यातील १४ डबे 'नॉन एक्झिक्युटिव्ह' तर दोन डबे 'एक्झिक्युटिव्ह' असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे ७८ आणि ५६ असेल. ही रेल्वे येत्या काळात 'शताब्दी एक्सप्रेस'ची जागा घेईल. सुरुवातीच्या टप्प्यात अशा नऊ रेल्वे देशात वेगवेगळ्या मार्गावर धावतील. ही रेल्वे बनवण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च आलेला आहे. आयात रेल्वेपेक्षा हा खर्च निम्म्यानं कमी आहे.टॅग्स :भारतीय रेल्वेवंदे भारत एक्सप्रेसIndian RailwayVande Bharat Express