भारतासह 'हे' पाच देश 15 ऑगस्टला साजरा करतात 'स्वातंत्र्यदिन'! By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 12:05 PM 2022-08-15T12:05:13+5:30 2022-08-15T12:11:53+5:30
Independence Day : यावर्षी भारत स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. भारतासोबत आणखी पाच देश 15 ऑगस्टला 'स्वातंत्र्यदिन' साजरा करतात. ते पाहूया... भारत भारतात आज स्वांतत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तसेच, सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेमुळे या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणाच्या भव्यतेत भर पडली आहे. दरम्यान, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. यावर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.
लिकटेंस्टीन जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या लिकटेंस्टीनला 1866 मध्ये जर्मन राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य मिळाले. मात्र 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय दिन 1940 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी संपूर्ण देशात सुट्टी असते. 5 ऑगस्ट 1940 रोजी, लिकटेंस्टीनच्या प्रिन्सिपॅलिटीच्या सरकारने अधिकृतपणे 15 ऑगस्ट हा देशाचा राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला.
बहरीन बहरीन 15 ऑगस्ट 1971 रोजी स्वतंत्र झाले. बहारीनवर ब्रिटनचा ताबा होता. या दिवशी बहरीनचा शासक इसा बिन सलमान अल खलिफा याची बहरीनच्या प्रमुख पदाची निवड झाली.
कांगो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोने 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रेंच राज्यकर्त्यांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले. हा देश मध्य आफ्रिकन प्रदेशात येतो. हे 1880 मध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांनी गुलाम बनवले होते. प्रथम हा देश फ्रेंच कांगो म्हणून ओळखला जात होता. नंतर 1903 मध्ये मध्य कांगो म्हणून ओळखला जात होता. स्वातंत्र्यानंतर, फुलबर्ट यूलू हे देशाचे पहिले राष्ट्रपती झाले आणि त्यांनी 1963 पर्यंत या पदी कायम होते.
उत्तर कोरिया उत्तर कोरियाही 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. हा देशही पूर्वी जपानच्या ताब्यात होता. दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्यानंतर उत्तर कोरियाही स्वतंत्र झाले.
दक्षिण कोरिया भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरियाही या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. यापूर्वी हा देश जपानच्या ताब्यात होता, मात्र 15 ऑगस्ट 1945 रोजी हा देश स्वतंत्र झाला.