या कारणांमुळे 16 वी लोकसभा ठरली वैशिष्ट्यपूर्ण By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 04:06 PM 2019-02-14T16:06:57+5:30 2019-02-14T16:19:17+5:30
16 व्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस बुधवारी संपन्न झाला. यावेळी अभिनंद आणि आभार मानले गेले. एकमेकांना कोपरखळ्या मारल्या गेल्या. मात्र काही विशिष्ट्य कारणांमुळे 16वी लोकसभा ही देशाच्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.
16 व्या लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने संपूर्ण पाच वर्षे पूर्ण बहुमताचे सरकार चालवले. 1984 नंतर प्रथमच लोकसभेमध्ये एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून सरकार स्थापन झाले होते.
16 व्या लोकसभेमध्ये एकूण 331 दिवस ( एक हजार 615 तास) काम झाले. 15 व्या लोकसभेच्या तुलनेत हे प्रमाण 20 टक्क्यांनी अधिक होते.
विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करत घातलेल्या गोंधळामुळे लोकसभेच्या एकूण कामकाजापैकी 16 टक्के वेळ वाया गेला.
16 व्या लोकसभेत एकूण 133 विधेयके पारित झाली. त्याआधीच्या लोकसभेच्या तुलनेत हे प्रमाण 15 टक्क्यांनी अधिक आहे.