ऑनलाइन लोकमत लोकसभेमध्ये बुधवारी महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना राहुल गांधी यांचा डोळा लागला आणि प्रसारमाध्यमांसह, विरोधकांना आयता मुद्दा हाती लागला. राहुल यांना लागलेल्या डुलकीची सोशल मिडियावर खिल्ली उडवली जात असली तरी, संसदेत डुलकी घेणारे राहुल फक्त एकटेच नसून या नेत्यांनी सुद्धा संसदेत चर्चेच्यावेळी डोळा लागला होता. भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनाही संसदेमध्ये चर्चा सुरु असताना झोप लागायची. १९९६ ते ९८मध्ये त्यांना संसदेमध्ये डुलक्या घेताना पाहण्यात आले आहे. मागच्यावर्षी संसदेत संविधान दिनाची चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही डोळा लागला होता. नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री संतोष गंगवार यांना सुद्धा संसदेमध्ये झोपताना कॅमे-यांनी टिपले होते. खुद्द पंतप्रधान मोदी भाषण करताना त्यांच्या मागच्या आसनावर बसलेले गंगवार डुलक्या घेत होते. माजी मनुष्यबळ विकास मंत्री आणि आताच्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी सुद्धा संसदेमध्ये झोपल्या होत्या. शिबू सोरेनविश्वास मत ठरावाबाबत संसदेत गंभीर चर्चा रंगली असताना स्वतःची 'डील'पूर्ण केलेले झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन सभागृहात चक्क झोपले होते. आपल्या लोकप्रतिनिधींना देशाची किती काळजी आहे हेच यावरून स्पष्ट होते. संसदेत विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांचे भाषण सुरू असताना सोरेन चक्क झोपलेल्या अवस्थेत आढळून आले होते.