‘कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस घेतलेल्यांना नेझल व्हॅक्सिन घेता येणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 08:57 AM2022-12-28T08:57:51+5:302022-12-28T09:08:49+5:30

भारताच्या व्हॅक्सिन टास्क फोर्सच्या प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती.

कोरोना विरोधातील लढ्यात नेझल लसीला गेल्याच आठवड्यात वापराची परवानगी देण्यात आली आहे. या लसीची किंमत ८०० रुपये इतकी असणार असून त्यावर खासगी रुग्णालय ५ टक्के जीएसटी आकारू शकतात. दरम्यान, ही लस कोण घेऊ शकतात यावर मोठी माहिती समोर आली आहे.

“भारतात ज्यांनी बूस्टर डोस घेतला आहे, त्या लोकांना नेझल व्हॅक्सिन दिली जाणार नाही,” अशी माहिती भारताचे व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन.के अरोरा यांनी दिली. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान, त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

जागतिक पातळीवर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना भारतानं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारने गेल्या शुक्रवारी याच तयारी अंतर्गत कोरोनाच्या नेझल लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. ही लस बूस्टर म्हणून वापरली जाईल आणि खाजगी रुग्णालयांमध्ये प्रथम उपलब्ध होईल.

डॉ. अरोरा यांना असेही विचारण्यात आले की, बूस्टर लसीच्या बूस्टर डोसनंतर लोकांना बूस्टर घेण्याची गरज आहे का? यावेळी वैज्ञानिक उत्तर असे आहे की आणखी लसींची आवश्यकता असेल की नाही याचा पुरावा नाही. अगदी ज्या देशांमध्ये लोकांनी तीन लसी घेतल्या आहेत. लसीचे चार किंवा पाच डोस, विशेषत: उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये ही एमआरए लस, परंतु त्यांनाही वारंवार संसर्ग होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

“ आपल्याला आणखी चौथा डोस घ्यायचा आहे असे समजा, 'अँटीजेन सिंक' नावाची एक संकल्पना आहे, ज्यानुसार एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारच्या अँटिजेनने वारंवार लसीकरण केल्यास शरीर प्रतिसाद देणे थांबवते किंवा खराब प्रतिसाद देते. त्यामुळे सुरुवातीला mRNA लस सहा महिन्यांच्या अंतराने दिली जाते आणि नंतर लोक तीन महिन्यांच्या अंतराने घेत आहेत. परंतु त्या परिस्थितीत त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे या क्षणी चौथा डोस घेण्याचे काही मूल्य नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

भारत बायोटेकची नेझल लस CoWIN अॅपवर उपलब्ध होईल. यासंदर्भात CoWIN प्लॅटफॉर्ममध्येही बदल करण्यात येणार आहेत. देशातील कोणताही व्यक्ती फक्त CoWIN अकाऊंटमध्ये साइन इन करू शकतो आणि लस स्लॉटसाठी अप्लाय करू शकतो. ही लस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल आणि आजपासून कोविड-19 लसीकरण प्रोग्राममध्ये समाविष्ट केली जाईल.

१८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना iNCOVACC नेझल लस मिळू शकते जी भारत सरकारनं मंजूर केली आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून वापरली जात आहे. नेझल लसीचे इंजेक्शनच्या तुलनेत बरेच फायदे आहेत. नेझल लसीची साठवण, वितरण आणि कमी कचरा निर्मिती होते. तसंच नाकावाटे दिली जाणारी लस विषाणूच्या एन्ट्री पॉइंट म्हणजेच नाक आणि  श्वसनमार्गाला संरक्षण प्रदान करते.