three people in India have the code to drop the atomic bomb kkg
ना राष्ट्रपतींकडे, ना एकट्या पंतप्रधानांकडे; अणुबॉम्बचा कंट्रोल 'या' त्रिमूर्तीकडे By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 11:51 AM2020-03-09T11:51:18+5:302020-03-09T12:06:16+5:30Join usJoin usNext जगातल्या अनेक देशांकडे अण्वस्त्रं आहेत. अनेकदा दोन राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाल्यावर अण्वस्त्रं डागण्याची धमकी राष्ट्रप्रमुखांकडून देण्यात येते. पाकिस्तानकडून मध्यंतरी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्यात आली होते. तर अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निर्माण झाला असतानाही अण्वस्त्रांच्या वापराचे इशारे देण्यात आले. अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या, इशारे देणं सोपं असलं तरी त्यांचा वापर करणं मात्र अजिबात सोपं नाही. अण्वस्त्रांच्या वापरांमुळे एखादा देश पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. म्हणूनच त्यांचा वापर जबाबदारीनं व्हावा आणि शक्यतो होऊच नये यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. समोरच्या देशाला धमकावताना अनेकदा राष्ट्रप्रमुख, महत्त्वाचे नेते, अणू बॉम्बचं बटन दाबू अशी धमकी देतात. पण खरंतर असं कुठलंच बटण नसतं. एखाद्या देशाच्या प्रमुखाकडेही अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी कोणतंही बटन नसतं. भारताचे पंतप्रधानदेखील त्याला अपवाद नाहीत. भारतीय पंतप्रधानांकडे एक स्मार्टकोड असतो. त्या माध्यमातून ते अण्वस्त्र हल्ल्याचे आदेश देऊ शकतात. अण्वस्त्र हल्ल्याचे विदारक परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच अण्वस्त्र हल्ल्याचा निर्णय एकटे पंतप्रधान घेऊ शकत नाहीत. अण्वस्त्र हल्ल्याचा निर्णय घेण्याआधी पंतप्रधानांना कॅबिनेट किंवा सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीचा सल्ला घ्यावा लागतो. अण्वस्त्र हल्ल्याचा निर्णय घेताना पंतप्रधानांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्याशी सल्लामसलत करावी लागते. टॅग्स :अणुयुद्धभारतपाकिस्तानअमेरिकाउत्तर कोरियापंतप्रधानnuclear warIndiaPakistanAmericanorth koreaprime minister