सिंहासन सजले, दरबार भरला, हजारोंच्या उपस्थिती राज्याभिषेक संपन्न झाला By बाळकृष्ण परब | Published: January 15, 2021 11:17 PM 2021-01-15T23:17:52+5:30 2021-01-15T23:22:25+5:30
Chaitanya Raj Singh : अनेक राजघराण्यांनी आपले रीतीरिवाज परंपरा ह्या जपून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे संस्थाने नसली तरी राज्याभिषेकासारखे सोहळे या राजघराण्यांकडून पार पडत असतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थाने राजेराजवाडे हे देशात विलीन झाले. मात्र असे असले तरी अनेक राजघराण्यांनी आपले रीतीरिवाज परंपरा ह्या जपून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे संस्थाने नसली तरी राज्याभिषेकासारखे सोहळे या राजघराण्यांकडून पार पडत असतात.
असाच एक राज्याभिषेक सोहळा आज राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
जैसलमेरमधील राजपुत्र चैतन्य राज सिंह यांचा राज्याभिषेक होऊन आज त्यांना राज्याच्या राजसिंहासनावर बसवण्यात आले. त्याबरोबरच ते जैसलमेरचे ४४ वे महारावल बनले.
जैसलमेरमधील सोनार दुर्ग किल्ल्यात चैतन्य राज सिंह हे रीतीरिवाज, धार्मिक परंपरा आणि जयजयकारादरम्यान, राजसिंहासनावर बसले.
माजी महारावल ब्रजराज सिंह यांचे २८ डिसेंबर रोजी निधन झाले होते. त्यामुळे त्यांचा मलमास समाप्त झाल्यानंतर आज चैतन्य राज सिंह यांना विधीपूर्वक सिंहासनावर बसवण्यात आले.
हा सोहळा पाहण्यासाठी जैलसमेरमधील जनता हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.