टिपू सुलतान जयंतीवरुन बेळगावात दोन गटांमध्ये तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 15:30 IST2017-11-16T15:23:30+5:302017-11-16T15:30:53+5:30

टिपू सुलतान जयंतीवरुन बेळगावात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. 15 नोव्हेंबरची ही घटना आहे.
खडक गल्लीत दोन गट भिडले. यावेळी हाणामारीसोबत झालेल्या दगडफेकीमुळे पोलीस आयुक्त व उपायुक्त जखमी झाले आहेत.
दगडफेकीत अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या गटांमध्ये तरुणांचा मोठा समावेश होता.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला, त्यानंतर पुन्हा जमाव भडकला आणि जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली.