Today Gold Rate: Gold and silver prices continue to fall, what is today's price ?, Know!
Today Gold Rate: सोने अन् चांदीच्या दरात घसरण कायम, काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 11:38 AM2022-01-11T11:38:42+5:302022-01-11T11:41:38+5:30Join usJoin usNext सध्याच्या काळात सोन्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून येत आहे. सोबतच सध्या जगावर ओमिक्रॉनचे सावट आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये घट झाली असून चांदी स्थिर आहे. मात्र या दोन्ही मौल्यवान धातुंची देशांतर्गत मागणी कमी असल्याने त्यांचे दर खाली येत आहेत. सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर १० ग्रॅमला ५४ रुपयांनी कमी होऊन ४६,८४८ रुपयांवर बंद झाले. चांदीचे दर किलोला ५९,२१७ रुपयांवर बंद झाले आहेत. मागील बंद किमतीच्या तुलनेत चांदीचे दर १७८ रुपयांनी खाली आले आहेत. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. टॅग्स :सोनंचांदीGoldSilver