Today Gold Rate: Gold and silver prices have risen, what is today's price ?, find out!
Today Gold Rate: सोने अन् चांदीच्या दरामध्ये झाली वाढ, काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:37 PM2022-01-12T12:37:43+5:302022-01-12T12:40:02+5:30Join usJoin usNext आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मौल्यवान धातूंच्या मूल्यामध्ये वाढ झाल्याच्या परिणामी देशांतर्गत मूल्यामध्ये वाढ झाली आहे. सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये १० ग्रॅमला १०४ रुपयांनी वाढ होऊन ते ४६,६०६ रुपयांवर बंद झाले. चांदीचे दरही प्रति किलो ५९,७०० रुपयांवर बंद झाले आहेत. मागील बंद मूल्यापेक्षा त्यामध्ये ४०८ रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. टॅग्स :सोनंचांदीGoldSilver