Today Gold-Silver Rate: Gold prices fall, silver prices fall; Find out, today's rate!
Today Gold-Silver Rate: सोन्याच्या भावा झाला कमी, चांदीच्या किंमतीतही घसरण; जाणून घ्या, आजचा दर! By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 07:46 PM2022-02-21T19:46:35+5:302022-02-21T22:13:01+5:30Join usJoin usNext गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत होती. सुवर्ण बाजार तेजीत असल्याने अनेकांनी त्याच्यात गुंतवणूक करण्यावर भर दिला असताना सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी एमसीएक्सवर एप्रिल वायदा सोन्याचा भाव २३३ रुपयांनी घसरून ४९,८७९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याच वेळी, मार्च वायदा चांदीचा भाव ५८१ रुपयांनी घसरून ६३,३२१ रुपये प्रतिकिलो झाला. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. टॅग्स :सोनंचांदीGoldSilver