CoronaVirus News: भारतासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा; कोरोना धडकी भरवणार By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 10:05 AM 2020-10-02T10:05:22+5:30 2020-10-02T10:13:44+5:30
Corona virus patient Death toll : एकट्या सप्टेंबर महिन्यात देशभरात कोरोनाचे तब्बल २६ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. हे प्रमाण कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४१.५३ टक्के आहे. शामध्ये कोरोनाचे रुग्ण कमालीचे वाढू लागले आहेत. दिवसाला 80 हजारावर रुग्ण सापडत आहेत. यामुळे आजचा दिवस भारतासाठी खूप महत्वाचा आणि तेवढाच धडकी भरविणारा ठरणार आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या एकूण आकडेवारीने 63,94,069 टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांत 81,484 नवे रुग्ण सापडले आहेत.
गेल्या 24 तासांत देशभरात 1095 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा 99,773 म्हणजेच लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
आज दिवसाच्या मध्यापर्यंत भारतात 1 लाख मृत्यूंचा टप्पा पार केला जाण्याची शक्यता आहे. सध्या देशभरामध्ये 9,42,217 रुग्ण उपचार घेत आहेत. 53,52,078 बरे झाले आहेत.
कोरोना रुग्णांच्या संख्येत सप्टेंबरमध्ये ४१ % भर चिंताजनक बाब म्हणजे देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला होता. त्यानंतर ते आतापर्यंतच्या कालावधीत एकट्या सप्टेंबर महिन्यात देशभरात कोरोनाचे तब्बल २६ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. हे प्रमाण कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४१.५३ टक्के आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे ३३,३९० जणांचा बळी गेला. हे प्रमाण आतापर्यंत बळी गेलेल्या ९८ हजारांहून अधिक जणांच्या तुलनेत ३३.८४ टक्के आहे. याच महिन्यात २४,३३,३१९ जण कोरोनाच्या आजारातून बरे झाले. हे प्रमाण आतापर्यंत बरे झालेल्या ५२ लाखांहून अधिक लोकांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४६.१५ टक्के आहे.
जगभरात कोरोनातून बरे झालेल्यांची सर्वात जास्त संख्या भारतात आहे. त्यानंतर ब्राझिल व मग अमेरिकेचा क्रमांक लागतो असे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.
असा गाठला रुग्णसंख्येने ६० लाखांचा पल्ला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून रुग्णसंख्येने १ लाखाचा पल्ला गाठण्यासाठी 110 दिवस लागले.
त्यानंतर ५९ दिवसांत रुग्णसंख्या १० लाखांवर गेली. त्या काळात कोरोनाचा फैलाव आणखी वाढू लागला होता. रुग्णसंख्या १० लाखांवरून २० लाख होण्यास २१ दिवस, २० लाखांवरून ही संख्या ३० लाख होण्यास १६ दिवस लागले.
त्यानंतरच्या १३ दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा ४० लाख झाला. त्यानंतरच्या ११ दिवसांत ५० लाख व त्यापुढील १२ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येने ६० लाखांचा पल्ला गाठला.