Todays Gold- Silver Rate: Gold prices continue to fluctuate; Find out, today's rate
Todays Gold- Silver Rate: सोनं अन् चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ -उतार सुरू; जाणून घ्या, आजचा दर By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:34 PM2022-04-14T12:34:16+5:302022-04-14T12:43:59+5:30Join usJoin usNext गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४९,००० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६७,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. टॅग्स :सोनंचांदीGoldSilver