Todays Gold-Silver Rate: अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्तम संधी; सोन्याच्या किंमतीत घट, चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या, आजचा दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:29 PM2022-05-03T14:29:23+5:302022-05-03T14:30:02+5:30

आज अक्षय्य तृतीया आहे.

आज अक्षय्य तृतीया आहे. तसेच लग्नसराईचा हंगाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते.

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,५१० रूपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा दर कमी आहे.

तर १ किलो चांदीचा दर ६२,३०० रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचा दरही गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी आहे.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.