Trade unions are nationwide
कामगार संघटनांचा देशव्यापी संप By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 04:11 PM2019-01-08T16:11:12+5:302019-01-08T16:17:30+5:30Join usJoin usNext विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी आज व उद्या (८, ९ जानेवारी) अखिल भारतीय संपाची हाक दिली आहे. केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्यातील रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांसह पोस्ट, बीएसएनएल कर्मचा-यांनी उडी घेतली आहे. याशिवाय या संपात विमा कंपन्या, संरक्षण उत्पादन कारखाने, केंद्र-राज्य सरकारी कार्यालये, वीज मंडळ, आरोग्य विभाग, अंगणवाडी, आशा कर्मचारी, कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, बांधकाम मजूर आदींचा सहभाग असल्याने देशभरातील कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे समजते. तसेच, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेनेही संपात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना या संपाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजपासून देशभरात ओडिसा, पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली यासह अनेक शहरात कामगार संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसक वळण आले. तर, जाळपोळीच्या घटना घडल्या. पश्चिम बंगालमध्ये कामगार संघटनांच्या आंदोलनाला 24 परगाना जिल्ह्यात हिंसक वळण आले. आंदोलकांनी बस फोडल्या आणि जाळपोळ केली. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपावरुन टीएमसी आणि सीपीएम कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचेही समजते.