ट्रॅफिक पोलिसास बेदम मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 02:08 PM 2021-06-02T14:08:09+5:30 2021-06-02T14:15:25+5:30
उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे ट्रॅफिक पोलीस हवालदारास बेदम मारहाण करण्यात आली आहे. नौबस्ता येथील वसंत बिहार चौकात नशेत धुंध असलेल्या तरुणाने ही मारहाण केली. उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे ट्रॅफिक पोलीस हवालदारास बेदम मारहाण करण्यात आली आहे. नौबस्ता येथील वसंत बिहार चौकात नशेत धुंध असलेल्या तरुणाने ही मारहाण केली.
राजकुमार असं ट्रॅफिक हवालदाराचं नाव असून आपली सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी धावाधावही केली. त्यावेळी, नागरिकांची मोठी गर्दी जमा झाल्यचं दिसून आलं.
राजकुमार असं ट्रॅफिक हवालदाराचं नाव असून आपली सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी धावाधावही केली. त्यावेळी, नागरिकांची मोठी गर्दी जमा झाल्यचं दिसून आलं.
संबंधित घटनेची नौबस्ता पोलिसांना माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, एका पोलीस शिपायाने नशेडी तरुणाला ताब्यात घेतले.
ट्रॅफिक पोलिसाच्या तक्रारीवरुन संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौबस्ता येथील राम कुमार हे यातायात पोलीस लाईनमध्ये तैनात आहेत.
राम कुमार यांची ड्युटी मंगळवारी गोविंद नगर येथे लावण्यात आली होती. ड्युटीवर जाण्यासाठी राम कुमार हमीरपूर रस्त्यावरुन जात होते. त्यावेळी, वसंत विहार चौकात दोन युवकांनी त्यांना थांबण्यासाठी इशारा केला.
राम कुमार यांनी आपली गाडी थांबवताच, त्या दोन युवकांनी पोलीस शिपायाला शिवीगाळ केली. त्यानंतर, चौकातच लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण करण्यात आली.
राम कुमार यांच्या अंगावरील वर्दी फाडून त्यांची नेमप्लेटही खेचण्यात आली. त्यावेळी, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. इतर आरोपी पळून गेले.
या घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी बनवला असून सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपीचे नाव आकाश शुक्ला असून तो नौबस्ताच्या संजय गांधी नगरचा रहिवाशी आहे.
ट्रॅफिक हवालदारास चौघांनी मारहाण केली होती, मात्र, पोलिसाने केवळ एकाच मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलीस शिपाई विनाहेल्मेट जात असल्यामुळे आपण त्यांना विचारपूस केली होती. त्यावरुन हा वाद झाल्याचे आरोपीने म्हटले आहे.