Train 18: Country's first engine-less train rolled out, see photo ...
इंजिन नसलेली ‘नेक्स्ट जनरेशन ट्रेन’ ट्रॅकवर, पाहा फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 10:15 PM2018-10-29T22:15:59+5:302018-10-29T22:33:33+5:30Join usJoin usNext भारतीय रेल्वेची नेक्स्ट जनरेशन ट्रेन-18चं (T-18) ट्रायल रन आजपासून सुरु झाले. इंजिन नसलेल्या या ट्रेनला चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये बनवण्यात आले आहे. ट्रायल पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन प्रवाशांसाठी 15 डिसेंबरपासून सुरु होऊ शकते. आधुनिक सुविधा असलेल्या या ट्रेनला बुलेट ट्रेनच्या मॉडेलवर तयार करण्यात आले आहे. या ट्रेनचा वेग 160 किमी प्रती तास आहे. तर शताब्दीचा वेग 130 किमी प्रती तास आहे. ट्रेन-18 मुळे प्रवासाचा वेळ 10 ते 15 टक्क्यांनी कमी होईल. तसेच, या ट्रेनच्या मध्ये 2 एक्जिक्यूटिव कंपार्टमेंट असतील. प्रत्येकात 52 जागा असतील. तर सामान्य डब्यात 78 जागा असतील. या ट्रेनच्या प्रतिकृतीसाठी 100 कोटी रुपयांचा खर्च आला असून भविष्यात त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होईल असा अंदाज आहे.टॅग्स :भारतीय रेल्वेIndian Railway