Trending Viral News : Two school students in pune discover six new preliminary asteroids
शाब्बास! पुण्याच्या २ शाळकरी पोरींनी केली कमाल; मंगळ आणि गुरूच्यामध्ये शोधले ६ लहान ग्रह By manali.bagul | Published: December 23, 2020 01:53 PM2020-12-23T13:53:57+5:302020-12-23T14:12:46+5:30Join usJoin usNext पुण्याच्या दोन शाळकरी मुलींनी खगोल विज्ञानात एक चांगली कामगिरी केली आहे. या दोन मुलींनी अंतराळात ६ (Asteroids) लघुग्रहांचा शोध लावला आहे. अंतराळात लहान ग्रह शोधण्याच्या त्यांच्या या संशोधनात एकूण २७ लहान ग्रहांचा समावेश होता. कलाम सेंटर एँण्ड इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल सर्च कोलॅबेरेशनद्वारे आयोजित ग्रह शोध अभियानाद्वारे या दोघांनी हा शोध लावला आहे. ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरच्या मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वव्यापी कार्यक्रमात २२ प्रतिस्पर्धींचा समावेश होता. त्यानंतर जगभरातील निवडक स्पर्धकांना मंगळ आणि गुरूच्याकक्षे दरम्यान असलेल्या पृथ्वीच्या जवळील डेटा आणि स्पॉट संभाव्य लघुग्रहांचे विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण दिले गेले. एकत्रितपणे, सहभागींनी 27 लघुग्रह शोधले. यापैकी सहा प्रारंभिक लघुग्रहांची ओळख पुण्याचील लोहेगावच्या विखे पाटील शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आली. शाळेतून मिळालेल्या माहितीनुसार आर्य पेल्ट आणि श्रेया वाघमारे अशी या मुलींची नावं आहेत. प्रारंभिक शोध मंगळ व गुरूच्या कक्षेदरम्यान असलेल्या मुख्य पट्ट्यात सापडलेल्या लघुग्रहांबद्दल आहेत. लघुग्रहांना साधारणत: 5 वर्षे लागतात ज्यानंतर त्यास गौण ग्रहानुसार अधिकृतपणे सूचीबद्ध केले जाऊ शकते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्व सल्लागार आणि कलाम सेंटरचे संस्थापक म्हणाले की, “हे लघुग्रह जाणून घेण्यासाठी आणि मॅपिंग करण्यात आमचा शोध हा महत्त्वाचा घटक आहे”. यामुळे ग्रहांभोवती असलेल्या इतर खगोलीय बाबींविषयी देखील माहिती देईल. (Image Credit- janpost.in)टॅग्स :पुणेजरा हटकेPuneJara hatke