Two IAF helicopters deployed to help flood victims in Bihar
बिहारमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी IAFची दोन हेलिकॉप्टर तैनात By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:58 PM2019-07-24T14:58:37+5:302019-07-24T15:07:47+5:30Join usJoin usNext बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरभंगा, सीतामडी आणि मधुबनी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय हवाई दल पुढे सरसावलं आहे. भारतीय हवाई दलानं दरभंगामध्ये अन्न पुरवण्याची सामग्री पोहोचवण्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात केली आहे. आतापर्यंत या पुरात 177 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. बिहारमधल्या शिवहर, सीतामडी, मुजफ्फरपूर, पूर्वी चंपारण, मधुबनी, दरभंगा, सहरसा, सुपौल, किशनगंज, अररिया, पूर्णिया आणि कटिहारमध्ये आतापर्यंत 106 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 80 लाख 85 हजार लोकांचं जनजीवन या पुरानं प्रभावित झालं आहे. टॅग्स :भारतीय हवाई दलबिहारपूरindian air forceBiharflood