UNESCO Heritage Status in Kumbh Mela!
कुंभमेळ्याला युनेस्कोचा हेरिटेज दर्जा ! By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 04:12 PM2017-12-08T16:12:58+5:302017-12-08T16:15:20+5:30Join usJoin usNext योगासनं आणि नवरोजनंतर युनेस्कोने आता कुंभमेळ्याला हेरिटेज म्हणजेच सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलं आहे. दक्षिण कोरियातील जेजू येथे सुरु असलेल्या बैठकीमध्ये कुंभमेळ्याला हेरिटेज यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडसमितीने कुंभमेळा हा शांततेत एकत्र येऊन साजरा केला जाणारा पृथ्वीवरील सर्वात मोठा उत्सव असल्याची दखल घेतली आहे. पवित्र जलाने स्नान करण्याबरोबरच विविध धार्मिक विधीही कुंभमेळ्याच्या काळामध्ये केले जातात. भारताच्या इतिहासाशी आणि सामाजिक सौहार्दाशी जोडलेला तो एक उत्सव असतो. त्याचप्रमाणे या उत्सवात सहभागी होण्याची सर्वांना समान संधी मिळते.