Nirmala Sitharaman : गुलाबीपासून क्रीम रंगापर्यंत... अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीतून मिळतो 'हा' खास संदेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:52 AM2024-07-23T11:52:54+5:302024-07-23T12:07:49+5:30

Union Budget 2024 Nirmala Sitharaman Saree Colour : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यात काय संदेश होता हे जाणून घेऊया...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत.

अर्थसंकल्पाच्या दिवशी त्या नेहमीच खास रंगाची साडी नेसून येतात. त्यामागे नक्कीच काहीतरी संदेश असतो. 7 वेळा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यात काय संदेश होता हे जाणून घेऊया...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९ मध्ये गुलाबी रंगाची साडी परिधान करून अर्थसंकल्प सादर केला होता. गुलाबी रंग स्थिरता आणि गांभीर्याचे प्रतिक मानला जातो.

कोणत्याही शुभ कार्यासाठी पिवळा रंग शुभ मानला जातो आणि २०२० मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पिवळ्या रंगाच्या साडीत अर्थसंकल्प सादर केला होता. पिवळा रंग उत्साह आणि उर्जेचे प्रतिक आहे.

२०२१ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पादरम्यान निर्मला सीतारामन यांनी क्रिम आणि लाल रंगाची साडी परिधान करून अर्थसंकल्प सादर केला. लाल रंग शक्ती आणि दृढनिश्चयाचे प्रतिक मानला जातो.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना ब्राऊन रंगाची साडी नेसली होती. हा रंग सुरक्षेचं प्रतिक आहे.

२०२३ मध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाल आणि काळ्या रंगाची बॉर्डर असलेल्या साडीत अर्थसंकल्प सादर केला होता. हा रंग शौर्य आणि शक्तीचं प्रतिक आहे.

२०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन निळ्या रंगाच्या आणि पानाची प्रिंट असलेल्या साडीत दिसल्या होत्या. निळा रंग शांतता, स्थिरता, प्रेरणा, ज्ञान आणि विश्वास यांचे प्रतिक आहे.

यावेळी अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन क्रीम रंगाची चेक्सची साडी नेसून आल्या आहेत, ज्याची गोल्डन लीव्स प्रिंटेड बॉर्डर आहे. साडीचा पदर मॅजेंटा आणि गोल्डन आहे.

क्रीम किंवा पांढरा रंग सत्याचं प्रतिक आहे. मॅजेंटा हा रंग युनिव्हर्सल हार्मनी आणि इमोशनल बॅलेन्स दर्शवतो, म्हणजेच हा रंग आनंद, वचनबद्धता आणि कौतुक व्यक्त करतो.