आंध्र प्रदेशमधल्या अराकू व्हॅलीमध्ये बलून फेस्टिव्हलचा अनोखा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 18:02 IST2017-11-14T17:59:33+5:302017-11-14T18:02:08+5:30

आंध्र प्रदेश राज्यातल्या विशाखापट्टनममधल्या अराकू व्हॅलीमध्ये बलून फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो.
अराकू व्हॅली हे दक्षिण भारतातलं सुंदर हिल स्टेशन म्हणूनही प्रसिद्ध आहे.
मंगळवारपासून या बलून फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे.
तीन दिवस चालणा-या या फेस्टिव्हलमध्ये अमेरिका, स्वित्झर्लंड, जपान, मलेशिया, तैवानसह 13 देश सहभाग नोंदवतात.
पर्यटनाला चालना देण्यासाठी हा बलून फेस्टिव्हल साजरा केला जातो. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून उंचावरून रंगीबेरंगी असे बलून आकाशात सोडले जातात.