UP Election Result : उत्तर प्रदेशात भाजप जिंकतोय! जाणून घ्या, कोण-कोणत्या गोष्टी 'मोफत' देणार योगी सरकार By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:51 PM 2022-03-10T12:51:08+5:30 2022-03-10T13:03:52+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या निकालांवरून (UP Election Result) जवळपास स्पष्ट झाले आहे. मोठी आघाडी घेत भाजपने सपाला प्रचंड मागे टाकले आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार, हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या निकालांवरून (UP Election Result) जवळपास स्पष्ट झाले आहे. मोठी आघाडी घेत भाजपने सपाला प्रचंड मागे टाकले आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप आणि सपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत जनतेला अनेक आश्वासने दिली होती. एवढेच नाही, तर या दोन्ही पक्षांनी जनतेला अनेक गोष्टी मोफत देण्याचेही आश्वासन दिले होते. तर जाणून घेऊयात, भाजपने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला नेमकी कोण कोणती मोठी आश्वासने दिली आहेत, जी आता त्यांना पूर्ण करावी लागतील.
शेतकऱ्यांना मोफत वीज - भाजपने पाच वर्षे सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. एवढेच नाही, तर भाजप सरकार आल्यास 14 दिवसांच्या आता उसाचे पेमेंट करण्यात येईल आणि विलंब झाल्यास व्याज देण्यात येईल, असे आश्वासनही भाजपने दिले आहे.
पेन्शनमध्ये वाढ - भाजपने विधवा आणि निराधार महिलांना मिळणारे पेन्शन 1500 रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे पेन्शन दरमहा एक हजार रुपये एढे आहे.
गरीब मुलिंना लग्नासाठी सहकार्य - मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत 15 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह अनुदान योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
मोफत सिलिंडर - प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना होळी आणि दिवाळीनिमित्त 2 मोफत एलपीजी सिलेंडर दिले जातील.
मोफत प्रवास - 60 वर्षांवरील महिलांना सार्वजनिक परिवहनने मोफत प्रवासाची सुविधा करून देण्यात येईल.
मोफत स्कूटी - राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन भाजपने केले आहे.
रोजगाराची व्यवस्था - भाजपने 5 वर्षांत 3 कोटींहून अधिक रोजगार देण्याचा दावा करत, पुढील पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबात किमान एक रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
मोफत कोचिंग - अभ्युदय योजनेंतर्गत UPSC, UPPSC, NDA, CDS, JEE, NIIT, TET, CLAT, तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी इच्छूक तरुणांना मोफत कोचिंग सुविधा देण्यात येणार.
स्मार्टफोन आणि टॅबलेट - स्वामी विवेकानंद युवा सशक्तीकरण योजनेंतर्गत 2 कोटी टॅब्लेट आणि स्मार्टफोनचे वाटप केले जाणार.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...