माकडानं पोलीस ठाण्याबाहेरून पळवले 3 लाख रुपये; होमगार्ड्सनी असे मिळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 00:13 IST2021-08-14T23:49:57+5:302021-08-15T00:13:27+5:30
पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आशिषकुमार सिंह आपली दुचाकी उभी करून आत गेले. याच दरम्यान, त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून एका माकडाने पिशवी काढली आणि तो ती घेऊन पळून गेला. (Uttar Pradesh Monkey)

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या होमगार्ड्सचे जबरदस्त कौतुक होत आहे. खरे तर, शनिवारी या पोलीस ठाण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या दुचाकीला असलेल्या डिक्कीतील तीन लाख रुपयांची पिशवी माकडाने लांबवली. माकडाचा हा संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्यातील दोन होमगार्ड्सनी पाहिला आणि त्यांनी त्या माकडाचा पाठलाग करत त्याच्या हातून ही पिशवी हिसकून घेतली. (Uttar Pradesh Monkey took a bag of with 3 lakh rupees from the out side of police station)
यानंतर, जेव्हा होमगार्ड्सनी ती पिशवीत पाहिली, तेव्हा त्यात त्यांयानंतर, होमगार्ड्सनी सर्व पैसे दुचाकी मालकाला परत केले. यामुळे होमगार्ड्सचे कर्तव्याप्रती निष्ठा आणि कामाप्रती प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.डल दिसले. यात पूर्ण तीन लाख रुपये होते.
यानंतर, होमगार्ड्सनी सर्व पैसे दुचाकी मालकाला परत केले. यामुळे होमगार्ड्सचे कर्तव्याप्रती निष्ठा आणि कामाप्रती प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.
हे प्रकरण हरदोईच्या सांडी पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. येथे शनिवारी पोलीस ठाण्याचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी परिसरातील बरेच लोक आले होते. याच वेळी, बमटापूर येथील आशिष कुमार सिंह उर्फ डब्ल्यू, कामानिमित्त पोलीस ठाण्यात आले होते.
पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आशिषकुमार सिंह आपली दुचाकी उभी करून आत गेले. याच दरम्यान, त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून एका माकडाने पिशवी काढली आणि तो ती घेऊन पळून गेला.
माकडाचे हे कृत्य तेथे तैनात असलेल्या होमगार्ड विकास अग्निहोत्री आणि अखिलेंद्र अग्निहोत्री यांयांनी पाहिले. यानंतर ते बराचवेळ माकडामागे धावले आणि त्यांनी त्याच्याकडून ती पैशांची पिशवी हिसकावली.
माकडाकडून बॅग हिसकावल्यानंतर होमगार्डने बॅगमध्ये पाहिले. तर त्यांना त्यात पैशांचे बंडल दिसले. यात थोडे थोडके पैसे नव्हते, तर तब्बल तीन लाख रुपये होते.
यानंतर होमगार्ड्सनी पैशांची पडताळणी केल्यानंतर संर्व पैसे संबंधित व्यक्तीला परत केले. आता प्रत्येकजण होमगार्ड्सचे कामाप्रती असलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करत आहे.