महाभयंकर! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळतानाची भयावह दृश्य पाहा By मोरेश्वर येरम | Published: February 7, 2021 01:08 PM 2021-02-07T13:08:55+5:30 2021-02-07T15:21:02+5:30
Uttarakhand: Glacier Burst In Chamoli District : उत्तराखंडमधील चामोली येथे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. हिमकडा कोसळल्यानं नदीला मोठा पूर येऊन जोशी मठाजवळील धरण देखीलं फुटलं आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात आज हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडलीय.
हिमकडा कोसळल्यानं नदीला महापूर आला आहे. यात नदीच्या जवळचा परिसर वाहून जाताना दिसतो आहे. यात अनेक घरांचं नुकसान झालं आहे.
उत्तराखंड सरकारने या घटनेनंतर हरिद्वारपर्यंत हायअलर्ट जारी केला असून घटनास्थळावर मदतकार्य सुरू केलं आहे.
हिमकडा कोसळल्याने जोशी मठाजवळील धरणाचा बांधही फुटला, याशिवाय नदीवरील दोन पुल देखील वाहून गेले आहेत.
दुर्घटनेमध्ये अनेक नागरिक वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
हिमकडा कोसळून ज्या नदीला पूर आलाय तिला धौली गंगा असं संबोधलं जातं. या नदीनं रौद्र रुप धारण केलंय.
उत्तराखंड सरकारने हायअलर्ट जारी केला असून मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत देखील घटनास्थळी निघाले आहेत.
हिमकडा कोसळून निर्माण झालेल्या महापूरात खूप मोठं नुकसान झालंय आणि जीवीतहानीचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रशासन मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी मदतकार्य करत असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन उत्तराखंड सरकारने केलं आहे.
जोशीमठ येथील हेड कॉन्स्टेबल मंगल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 वाजून 55 मिनिटांनी जोशीमठ पोलीस ठाण्यातून रैणी गावात हिमकडा कोसळल्याची माहिती मिळाली होती