लसीकरणापासून स्वदेशीपर्यंत! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेल्या संबोधनातील १० प्रमुख मुद्दे By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 01:09 PM 2021-10-22T13:09:23+5:30 2021-10-22T13:15:46+5:30
Narendra Modi News: देशात सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरणाचे १०० कोटी डोस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. या संबोधनामध्ये मोदींनी कोरोनाविरोधातील लढाई, लसीकरण, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार, तसेच पुढील काळात घ्यावयाची खबरदारी अशा अनेक मुद्यांचा उल्लेख केला. त्यातील १० प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे... देशात सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरणाचे १०० कोटी डोस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. या संबोधनामध्ये मोदींनी कोरोनाविरोधातील लढाई, लसीकरण, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार, तसेच पुढील काळात घ्यावयाची खबरदारी अशा अनेक मुद्यांचा उल्लेख केला. त्यातील १० प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे...
देशाने कोरोनाविरोधातील लसीचे १०० कोटी डोस देण्याचे लक्ष्य गाठले आहे. हा केवळ आकडा नाही तर देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. हे त्या भारताचे चित्र आहे. जो कठीण लक्ष्य निर्धारित करून ते लक्ष्य गाठणे जाणतो.

कोरोना काळात देशाचा एकच मंत्र राहिला आहे तो म्हणजे जर कोरोनाचा आजार कुठला भेदभाव करत नसेल तर लस देतानाही कुठलाही भेदभाव होता कामा नये. त्यामुळे लसीकरणामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्हीआयपी कल्चरचा प्रभाव वाढणार नाही, याची खबरदारी घेतली गेली.

कोरोनाविरोधातील भारताची लसीकरण मोहीम सबका साथ, सबका विश्वास, सबका विश्वासचे उत्तम उदाहरण आहे.
कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाली तेव्हा टाळ्या, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले, तेव्हा याची खिल्ली उडवली गेली. टाळ्या, थाळ्या वाजवून कोरोना जाणार का असे कुत्सितपणे विचारले गेले. मात्र या माध्यमातून देशाची एकात्मता आणि सामर्थ्य दिसले.
आज देशातील चहुबाजूला एक विश्वास आहे. देशविदेशातील अनेक संस्था भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक आहेत. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी हौसिंग सेक्टरमध्ये नवी उर्जा दिसत आहे.
आज देशातील चहुबाजूला एक विश्वास आहे. देशविदेशातील अनेक संस्था भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक आहेत. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी हौसिंग सेक्टरमध्ये नवी उर्जा दिसत आहे.
पंतप्रधान मोदींनी सांगितले की कवच कितीही उत्तम असले, आधुनिक असले, त्याच्यापासून सुरक्षेची पूर्ण हमी असली तरी जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत हत्यारे खाली ठेवली जात नाहीत. सणावारांदरम्यान, पूर्ण खबरदारी घ्या असे, माझे तुम्हाला आवाहन आहे.
मोदींनी सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा बाजारात मेड इन हे, मेड इन ते या देशांच्या वस्तू दिसायच्या. मात्र आता प्रत्येक देशवासी मेड इन इंडियाची शक्ती अनुभवत आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही वस्तूंच्या खरेदी करताना ती मेड इन इंडिया आहे का हे पाहून खरेदी करा.