Varanasi: पंढरीची वारी; 'योगी मॉडेल"च्या अभ्यासाला पोहोचले सोलापूरचे कलेक्टर-एसपी By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 04:31 PM 2022-08-26T16:31:10+5:30 2022-08-26T17:40:01+5:30
हे विश्वची माझे घर आणि आता विश्वात्मके देवे या पंक्तींनी ज्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच ग्लोबलायझेशनची संकल्पना मांडली होती. त्या संत महात्म्याचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूर. पंढरीची वारी म्हणजे या संतांच्या आगमनाचा सोहळा आणि लाखो भाविकांचा उत्सव. याच पंढरीच्या आषाढी एकादशी सोहळ्याची दखल केंद्र सरकारने घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वीच देहूला भेट देत पंढरीच्या वारीचं कौतुक केलं. हे विश्वची माझे घर आणि आता विश्वात्मके देवे या पंक्तींनी ज्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच ग्लोबलायझेशनची संकल्पना मांडली होती. त्या संत महात्म्याचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूर. पंढरीची वारी म्हणजे या संतांच्या आगमनाचा सोहळा आणि लाखो भाविकांचा उत्सव. पंढरीच्या आषाढी एकादशीची दखल केंद्र सरकारने घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वीच देहूला भेट देत पंढरीच्या वारीचं कौतुक केलं.
पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनसाठी येतात, यावेळी प्रशासन आणि राज्य सरकारी यंत्रणेवर मोठा भार असतो, व्यवस्थापन आणि सुरक्षा या दोन्हीसाठी कंबर कसून यंत्रणा कामाला लागलेली असते. त्यामुळेच, या यंत्रणांनी आता योगींच्या वाराणसी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी वाराणसी गाठली आहे.
श्रावण महिना म्हणजे काशी-वारासणीत उत्सवांचा मेळा, हरहर शंभो म्हणत लाखो भाविक वाराणसीत दाखल होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असल्याने येथील यंत्रणाही सुपरफास्ट असते. येथील क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीमची सध्या देशभरात चर्चा आहे. या यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी आता सोलापूरचे अधिकारी वाराणसीला पोहोचले आहेत.
काशीतील क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीमने इतर राज्यातील अधिकाऱ्यांनाही प्रभावित केलं आहे. त्यामुळेच, महाराष्ट्रातील पंढरीच्या वारीचं क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी सोलापूरचे कलेक्टर मिलिंद शंभरकर आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाराणसीला भेट दिली. तसेच, पंढरपुरात ही सिस्टी लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
जिल्हाधिकारी शंभरकर आणि पोलीस अधिक्षक सातपुते यांच्यासह टीम वाराणसीत दाखल झाली आहे. यावेळी, वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतिश गणेश यांनी त्यांचं स्वागत केलं. तसेच, क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीमवर आपलं प्रेझेंटेशनही दोन्ही अधिकाऱ्यांसमोर मांडलं.
गणेश यांनी आपल्या प्रेझेंटनेशनमध्ये सांगितले की, श्रावण महिन्यातील उत्सवास ९ दिवसांच्या उप्रकमात विभागणी करुन पूर्ण कार्यक्रम तयार केला होता. त्यामध्ये, श्रावण महिन्यातील ४ सोमवार, शिवरात्री, आमवस्या, हरियाली तीज, नागपंचमी आणि रक्षाबंधन या ९ विविध टप्प्यांमध्ये कार्यक्रमाची आखणी केली.
केवळ काशी विश्वनाथच नाही, तर वाराणसीतील सर्वच प्रमुख धाम आहेत, त्याठिकाणी होणाऱ्या गर्दीसाठी उत्तम मॅनेजमेंट केलं होतं. तसेच, ज्याठिकाणी सर्वाधिक गर्दी होईल, त्याच ठिकाणी अधिकत लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं.
कोविडनंतरची यंदाच्या श्रावण महिन्यात प्रथम भाविकांची गर्दी होणार होती. त्यासाठी, घाटावरील प्रत्यक्ष गर्दी ते सोशल मीडियाचा वापर करुन यंत्रणा उभी करण्यात आली होती. व्हीव्हीआयपींसाठीचीही विशेष यंत्रणा राबवून त्यांच्यासाठीचंही मॅनेजमेंट करण्यात आलं होतं.
ट्रॅफिक, मॉनेटरींग, एनडीआरएफची टीम, पार्किंग व्यवस्था, बॅरिकेड्स यासंह अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. क्राऊड कंट्रोलमधील पार्कींग क्षेत्रांनाच मदतनीस म्हणून घेण्यात आले. तर, १८ बॅरिकेड्स असलेल्या यंत्रणांचाही मदत घेण्यात आली होती.
आध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर, जम्मू-काशीरच्या वैष्णो देवी मंदिर हे दोन्ही डोंगरावर आहेत, तेथे भाविकांची मोठी गर्दी होते. पण, काशी विश्वनाथ मंदिर हे शहराच्या मधोमध आहे. त्यामुळे, येथे होणारी गर्दी दुरदूर पसरते. त्यामुळेच, येथील गर्दीचं नियंत्रण आणि नियोजित सुरक्षा यंत्रणा एक चॅलेंज आहे.
दरम्यान, गेल्या श्रावण महिन्यात काशी-विश्वनाथ येथील मंदिंरात १ कोटी पेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. त्यादरम्यान, स्वत: योगी आदित्यनाथ यांनी या सिस्टीमचे मॉनिटरींगे केले होते. तसेच, स्थानिक मंदिर परिसरात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत.