गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजपा सरकार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थित शपथविधी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 15:17 IST2017-12-26T15:11:37+5:302017-12-26T15:17:27+5:30

विजय रुपाणी यांनी मंगळवारी (26 डिसेंबर) गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांनी त्यांना पदाची शपथ दिली. रुपाणी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेत
नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासहीत दिग्गजदेखील होते उपस्थित
अहमदाबादमधील गांधीनगर येथील सचिवालयाच्या मैदानावर गुजरात मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारदेखील होते उपस्थित
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील शपथविधी सोहळ्यासाठी हजर होते