ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. ट्विटर आणि फेसबुकवर ते अनेकदा नेटिझन्सच्या निशाण्यावर असतात. तर काही प्रसंग असेही होते, जेव्हा त्यांचे खूप कौतूकही झाले. गुजरातमध्ये दलितांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावर राजनाथ सिंग यांचे भाषण चालू असताना काँग्रेसचे खासदार विरोध करत होते. घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी चक्क झोपले होते. कॅमे-यांनी हे दृश्य टिपले आणि सोशल मिडियावर नेटिझन्सना मुद्दा मिळाला. राहुल यांची संसदेत झोपण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही जुलै २०१४ रोजी डुलक्या घेतना ते कॅमेऱ्यात कैद झाले होते. कधी संसदेत डुलक्या घेतल्यामुळे, कार्यकर्त्यांनी चप्पल उचल्यामुळे असो अथवा नेपाळ भुकंपाच्या वेळी मदतीसाठी संदेश लिहताना केलेला मोबाईलचा वापर असो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असणारे राहुल गांधी. पाहूयात आतापर्यंत चर्चेत कसे राहिले. राहुल गांधींचे व्हायरल झालेले काही फोटो... गुजरातच्या उनामध्ये चार दलित युवकांना झालेल्या मारहाणीचा मुद्यावरुन काँग्रेसने लोकसभेमध्ये सत्ताधा-यांना धारेवर धरले. मात्र हा मुद्दा उपस्थित करणा-या काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली. कारण या महत्वाच्या विषयावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग बोलत असताना राहुल गांधी चक्क डुलक्या घेत होते. राहुल गांधींच्या या डुलक्या कॅमे-याने टिपल्या. राजनाथ सिंह यांचे भाषण चालू असताना काँग्रेसचे खासदार विरोध करत होते. घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी झोपले होते. कॅमे-यांनी हे दृश्य टिपले. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या श्रद्धांजली सभेत प्रियंका वढेरांची मुलगी मिरायासोबत राहुल गांधी बोलत होते. मामा-भाचीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मामा राहुल यांचा हात हाती घेऊन जणू मिरायाला म्हणत आहे की... सांगा आपल्यात कोण अधिक गोरे आहे ? २०१५ मध्ये राहुल गांधी सुट्टीवर कुठे गेले आहेत, यावरुन तर्क-वितर्क लावले जात होते. या दरम्यान एका काँग्रेस कार्यकर्त्याने सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो अपलोड केले आणि ते उत्तराखंडमध्ये असल्याचे म्हटले होते. २०१५ मध्ये पद्दचेरी येथील पूरग्रस्तांच्या भेटीसाठी गेलेल्या राहुल यांचा हा फोटो वादग्रस्त ठरला होता. राहुल गांधींची पादत्राणे हातात घेतलेले काँग्रेसचे नेते नारायणसामी यात दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पद्दुचेरीमध्ये काँग्रेस विजयी झाली असून नारायणसामींना मुख्यमंत्री केल्यानंतर हा फोटो व्हायरल झाला होता. २०१५ मध्ये नेपाळ भूकंप पिडितांची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधीचा हा फोटो व्हायरल झाला होता. कथित रित्या म्हटले गेले होते की नेपाळ पीडितांसाठीचा शोक संदेश राहुल यांनी मोबाइलमध्ये पाहून लिहिला होता. २०१५ च्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे राहुल गांधी यांचे लिखित भाषण असल्याचे म्हटले जात होते. नोव्हेंबर २०१५ मध्ये राहुल गांधी बंगळुरु येथील एका कॉलेजमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाविरोधात वक्तव्य केले होते. याची सोशल मीडियावर टर उडवण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या जेएनयू वादानंतर विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमारसोबतचा राहुल गांधींचा हा फोटो सोशल मीडियात चर्चेत होते