West Bengal ED Raid: 50 कोटी रोख, सोन्याच्या विटा-दागिने; अर्पिताच्या फ्लॅटमध्ये आतापर्यंत काय मिळालं..? By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:42 PM 2022-07-28T13:42:45+5:30 2022-07-28T14:05:50+5:30
West Bengal ED Raid: पश्चिम बंगालमधील ममता सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जीच्या घरांवर छापेमारी केली. यात आतापर्यंत 50 कोटींहून अधिकची रोख आणि अनेक किलो सोने सापडले आहे. Teacher Vacancy Scam: पश्चिम बंगालमधील ममता सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी देशभरात चर्चेत आले आहेत. पार्थ चॅटर्जीला ईडीने अटक केली केली आणि चॅटर्जीची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरांवर छापेमारी केली. यात आतापर्यंत 50 कोटींहून अधिकची रोख आणि अनेक किलो सोने सापडले आहे. या प्रकरणी ईडी मनी ट्रेलचा तपास करत आहे.
हा घोटाळा 2014 चा आहे. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाने (एसएससी) पश्चिम बंगालमधील सरकारी शाळांमधील शिक्षकांची भरती रद्द केली होती. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली. पार्थ चॅटर्जी त्यावेळी शिक्षणमंत्री होते. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयात अनियमिततेच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या दरम्यान, टीईटी परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांनाही नोकरी मिळाली
कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना गुणवत्ता यादीत वरचे स्थान मिळाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. एवढेच नाही तर काही तक्रारीही, होत्या ज्यात उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत नसतानाही त्यांना नोकरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याचिकाकर्त्यांनी दावा केला की, टीईटी देखील नापास झालेल्या उमेदवारांनाही नोकऱ्या दिल्या.
याप्रकरणी ईडीने पार्थची सहकारी आणि या शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीच्या ठिकाणांवर छापेमारी केली. काल म्हणजेच बुधवारी ईडीच्या पथकाने अर्पिताच्या दुसऱ्या फ्लॅटवर छापा टाकला. अर्पिताच्या या दुसऱ्या फ्लॅटमध्ये सापडलेली रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले. दोन हजारांच्या नोटांच अक्षरशः ढिग सापडला.
एवढेच नाही तर सोन्याच्या वीटा, दागिने, विदेशी चलन आणि मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ईडीच्या गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दोन छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 50.36 कोटी रुपये रोख आणि 5.07 कोटी रुपयांचे सोने सापडले आहे. म्हणजेच आतापर्यंत ईडीच्या पथकाने 55 कोटींहून अधिकचा काळा पैसा जप्त केला आहे.
फ्लॅटमधून सुमारे 30 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. यासोबतच दागिने आणि पाच किलो सोनेही सापडले आहे. सोन्याची किंमत 4.31 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. त्यांच्या शेजारील लोकांनाही या एवढ्या मोठ्या संपत्तीबाबत माहिती नव्हती.
अर्पिता मुखर्जीचा हा दुसरा फ्लॅट आहे, यापूर्वी ईडीला अर्पिता मुखर्जीच्या टालीगंजमधील फ्लॅटमधून 21 कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच ईडीने अर्पिताच्या दोन घरांतून 50 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना अटक करण्यात आली असून, दोघांना 3 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
इडीच्या छाप्यात 55.43 कोटींहून अधिकची रक्कम सापडली आहे. सोन्याची एकूण रिकव्हरी सुमारे 5 किलो आहे, ज्यामध्ये 1-1 किलो वजनाच्या 3 सोन्याच्या पीटा आहेत, अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याच्या पेनाचा समावेश आहे. ईडीच्या गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दोन छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 50.36 कोटी रुपये रोख आणि 5.07 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.