सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना... By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 08:44 AM 2020-08-06T08:44:26+5:30 2020-08-06T08:49:31+5:30
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? सरकारी योजना आहे ना... भविष्याची चिंता सतावणाऱ्या लोकांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरचे खर्चाचे ओझे बऱ्यापैकी कमी होणार आहे. सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? सरकारी योजना आहे ना... भविष्याची चिंता सतावणाऱ्या लोकांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरचे खर्चाचे ओझे बऱ्यापैकी कमी होणार आहे.
आज प्रत्येकजण आपले जिवन आपल्या मर्जीने, स्वावलंबी होऊन जगण्याची इच्छा ठेवतो. मुलांवर अवलंबून राहण्यापेक्षा म्हातारपणी आपल्याच पैशांनी जगण्याची तजविज करतो. सरकारी नोकरदारांना याचे टेन्शन नसते. पण खासगी लोकांना यासाठी अटल पेन्शन योजना मदतीची ठरू शकते.
भारत सरकार या योजनेद्वारे कमीतकमी पेन्शन देण्याची गॅरंटी देते. या योजनेचा कसा लाभ उठवावा याची माहिती खाली दिलेली आहे.
मोदी सरकारने ही योजना लाँच केली आहे. अटल पेन्शन योजना (APY)मध्ये थोडी थोडी रक्कम दर महिन्याला गुंतवून म्हातारपणी एक ठराविक परंतू कायमची पेन्शन मिळविता येते. या योजनेसाठी एक खाते उघडावे लागते.
अटल पेन्शन योजना ही 2015 मध्ये सुरु झाली होती. निवृत्तीनंतर एका ठराविक उत्पन्नासाठी ही य़ोजना सुरु झाली. 18 ते 40 वर्षांचे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत पेन्शन मिळविण्यासाठी कमीतकमी 20 वर्षे गुंतवणूक करावी लागणार आहे.
जर तुमचे वय 18 ते 40 वर्षे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एका ठराविक रक्कम मिळत राहणार आहे.
योजनेनुसार तुम्हाला कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीतजास्त 5000 रुपये मासिक पेन्शन मिळत राहणार आहे. 18 वर्षांचा तरुण या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला 60 वर्षांनी 5000 रुपये महिन्याला पेन्शन मिळविण्यासाठी 210 रुपये भरावे लागणार आहेत.
महत्वाचे म्हणजे पॉलिसीधारकाच्य़ा अकाली मृत्यूनंतर जमा झालेली रक्कम ही त्याच्या वारसदाराला दिली जाणार आहे. यामुळे या योजनेत जमा केलेला पैसा बुडणार नाही. तसेच जर 60 वर्षांआधी काही संकटात पैसे काढायचे असतील तर ते देखील शक्य आहे.
तुम्हाला किती पेन्शन हवी आहे हे देखील ठरविता येते. यानुसार महिन्याला हप्ता बसतो. वय वाढलेले असल्यास या योजनेत सुरुवातीला जास्त रक्कम भरावी लागते. 20 वर्षांचे असताना योजना घेतल्यास 248 रुपये गुंतवावे लागणार आहेत. वयानुसार ही रक्कम वाढत जाणार आहे.
खाते कसे उघडावे? अटल पेन्शन योजनेसाठी बँक किंवा पोस्टामध्ये खाते असणे गरजेचे आहे. बँकेत जाऊन किंवा नेट बँकिंगद्वारे खाते खोलता येते. पैसे जमा करण्यासाठी मासिक, तिमाही किंवा सहामाई असे पर्याय असतात. हे पैसे आपोआप वळते केले जातात.
आयकरातही बचत या योजनेतून तुम्ही आयकरामध्येही बचत करू शकता. 1.5 लाख रुपये वाचविता येतात. ही सूट 80C अंतर्गत मिळते. अधिक माहितीसाठी http://www.dif.mp.gov.in/FI_Plan_MP/APY/APYSchemeHindi.pdf हे पाहू शकता.