असहिष्णुतेचे बळी कधी थांबणार ?, मारेकरी अद्यापही मोकाटच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:11 IST2017-09-06T16:57:02+5:302017-09-06T17:11:04+5:30

मुंबईतल्या पश्चिम उपनगरांतील अनधिकृत बांधकामे व भूमाफिया यांच्याविरुद्ध सातत्याने आवाज उठविणारे भूपेंद्र वीरा यांची 15 ऑक्टोबर 2016 रोजी वाकोल्यातील कलिना मशिदीजवळील राहत्या घरी गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरूमधील राहत्या घरी रात्री आठ सव्वाआठच्या सुमारास तीन ते चार हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या केली.
16 ऑगस्ट 2011 रोजी भोपाळमध्ये राहणा-या शेहलाची तिच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शेहला मसूद हत्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने मुख्य आरोपी झाहिदा परवेझसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कर्नाटकमध्ये कन्नड विचारवंत एम एम कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून हत्या केली होती. धारवाड येथे राहणारे 77 वर्षीय एम एम कलबुर्गी सकाळी घराबाहेर पडत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कलबुर्गी यांचा मृत्यू झाला.
चार वर्षांपूर्वी म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात पाठीमागून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शेवटपर्यंत खरे खुनी सापडलेच नाहीत.
तळेगाव दाभाडे येथील आरटीआय कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार विरोधी दक्षता समितीचे जिल्हा संघटक सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी हत्या झाली होती. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील काही जमिनी आयआरबीने बळकावल्याचा त्यांनी आरोप केला होता. सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती