लोकसभा निवडणुकीत भाजपचं नेमकं कुठं चुकलं? प्रशांत किशोर यांनी सांगितले 3 मोठ फॅक्टर, PM मोदींचंही नाव घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 04:51 PM2024-09-09T16:51:38+5:302024-09-09T17:08:07+5:30

गेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) जबरदस्त हवा निर्माण केली होती.

गेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) जबरदस्त हवा निर्माण केली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर, भाजपला मोठा धक्का बसला. असे का घडले? यासंदर्भात निवडणूक रणनीतीकार तथा जन सूरजचे संस्थापक प्रशांत किशोर (पीके) यांनी भाष्य केले आहे.

ज्या महत्वाच्या घटकांमुळे अथवा फॅक्टर्समुळे भाजपला धक्का बसला, अशा तीन घटकांकडे प्रशांत किशोर (पीके) यांनी लक्ष वेधले आहे.

ज्या कारणांमुळे भाजपला फटका बसला, त्यासंदर्भात बोलताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी, ब्रँड मोदीवर खूप जास्त अवंबून राहणे हे पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण सांगितले आहे.

दुसरा घटक सांगताना जन सुराजचे संस्थापक पीके म्हणाले, भाजपने '400 पार' ची अर्धवट घोषणा दिली. त्यांच्या मते, विरोधकांनी 400 पारची घोषणा पूर्ण करत ती संविधाना आणि लोकशाहीशी जोडली.

तिसरा घटक सांगताना प्रशांत किशोर म्हणाले, भाजपच्या निश्चित मतदारांनाही पंतप्रधान मोदींची भाषा आवडली नाही. ते म्हणाले, मोदींच्या चाहत्यांनाही हे आवडले नाही. तेही म्हणाले की हे सर्व मोदींच्या तोंडून बरे वाटत नाही.

खरे तर, निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मटण, मुजरा, मंगळसूत्र, मुस्लिम, मशीद, मदरसा, आदी शब्दांचा रॅलीदरम्यान वापर केला होता. प्रशांत किशोर इंडिया टीव्हीच्या कार्यक्रमात बोलत होते.